ऊस बिलासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नव्हे तर काँग्रेस भवन समोर शेतकऱ्यांचा ठिय्या…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊस बिलासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नव्हे तर काँग्रेस भवन समोर शेतकऱ्यांचा ठिय्या…

सोलापूर - माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील व तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी

काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली
वीजवितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात कॉंग्रेस धडकली (Video)
संवाद हरवल्याने काँग्रेसची वाताहात!

सोलापूर –

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील व तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काँग्रेस भवनसमोर ठिय्या आंदोलन केलेय.म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्यात गेल्या वर्षी अक्कलकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस घातला होता.मात्र, गेल्या वर्षीपासून आजतागायत एफआरपीची रक्कम मिळाली नाही अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.

शेतकऱ्यांना उसाची बिलं गाळप झाल्यानंतर साखर कारखान्याने पंधरा दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. तसा (एफआरपी) कायदा देखील आहे.पण हा कायदा पायदळी तुडवत वर्ष लोटले तरीही एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही.जिल्हाधिकारी यांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या साखर कारखान्यावर कडक कारवाई करत 2021-2022 ला ऊस गाळपाचा परवाना न देता आर.आर. सी.( rrc ) काढून कारखाना जप्त करण्याचा आदेश देण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.

ऊस बिल अदा करण्याच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिवसभर काँग्रेस भवनसमोर ठिय्या दिला त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते काँग्रेस भवन येथे फिरकलेच नाहीत.

COMMENTS