उपोषणास बसलेल्यांवर कारवाईची टांगती तलवार…; तहसीलदार देवरेंनी दिला संबंधित कर्मचार्‍यांचा अहवाल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपोषणास बसलेल्यांवर कारवाईची टांगती तलवार…; तहसीलदार देवरेंनी दिला संबंधित कर्मचार्‍यांचा अहवाल

पारनेर/प्रतिनिधी- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बदलीच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन करणारांसह अन्य अनुपस्थित कर्मचार्‍यांवर प्रशासकीय कारवाईची

मुस्लिम समाज इफ्तार पार्टी, खजूरपुरता मर्यादित नाही !
पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत
मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही : ना बाळासाहेब थोरात

पारनेर/प्रतिनिधी- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बदलीच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन करणारांसह अन्य अनुपस्थित कर्मचार्‍यांवर प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार दिसू लागली आहे. तहसीलदार देवरे यांनी या सर्व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची शिफारस करणारा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पाठवला आहे.
देवरेंच्याविरोधात पारनेरच्या महसूल कर्मचार्‍यांचे 7 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात 7 व्या दिवशी फक्त 32 कर्मचारी उपस्थित होते. तर उर्वरित 27 कर्मचारी ना आंदोलनस्थळी उपस्थित होते ना कामाच्या ठिकाणी. त्यांच्या अनुपस्थितीबाबत ते काम करत असलेल्या कार्यालयाला देखील कुठलीही माहिती दिली नसल्याने आपत्ती व्यवस्थापन (कोव्हीड 19) व पुरवठा विभागाचे कामकाज ठप्प असल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, असा अहवाल तहसीलदार देवरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठविला आहे. या अहवालात म्हटले आहे की, महसूल कर्मचार्‍यांचे 25 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू आहे.याबाबत रोज ई-मेल द्वारे अहवाल सादर केला जात आहे. परंतु या आंदोलनामध्ये महसूल विभागाचे नेमके किती कर्मचारी सहभागी आहेत, हे अद्याप महसूल कर्मचारी संघटनेने तहसील कार्यालयाला कळविले नाही. मंगळवारी (31 ऑगस्ट) दुपारी 11:50 वाजता किती कर्मचारी आंदोलनस्थळी आहे याची खात्री केली असता फक्त 32 कर्मचारी आंदोलन स्थळी असल्याचे निदर्शनास आले. तहसील कार्यालयातील 4 नायब तहसीलदारांच्या समोर खातरजमा करून उपस्थित 32 कर्मचार्‍यांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या. उर्वरित 27 कर्मचारी हे आंदोलन स्थळी उपस्थित नव्हते व ते कार्यालयात देखील हजर नव्हते. त्यांच्या कार्यालयातील अनुपस्थितीबद्दल कार्यालयाकडे कुठलीच परवानगी अथवा माहिती नव्हती. या कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे आपत्ती व्यवस्थापन (कोव्हीड 19, नैसर्गिक आपत्ती) व पुरवठा विभाग अत्यावश्यक सेवेचे कामकाज ठप्प झाले असल्याने त्या कर्मचार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, असे अहवालात म्हटले आहे.

हे आहेत अनुपस्थित
आंदोलनस्थळी व कार्यालयामध्ये अनुपस्थित असणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये साठे डी.बी.(तलाठी, जवळा), पवार एस.ई.(तलाठी, रांजणगाव मशीद), मंडलिक एस.बी.(मंडलाधिकारी, सुपा), मोरे एस. एल.(तलाठी, सुपा), सोनवणे पी.एस.(तलाठी, चिंचोली), गोल्हार आर. डी.(तलाठी, पाडळी कान्हूर), मुदिगोंडा एस.(रोहयो), कदम एस.डी.(पुहिअका), औटी एस. बी.(पुअका), गावडे ए.आर.(तलाठी, पळवे), पवार डी.डी.(महसूल सहायक), चव्हाण डी. यु. (महसूल सहायक), राजुरे पी.(महसूल सहायक), बल्लाळ डी. के.(तलाठी, पारनेर), गोरे ए. एस. (तलाठी, टाकळी ढोकेश्‍वर), कोते एस. सी.(तलाठी, वाळवणे), येवले बी. एस. (तलाठी, गोरेगाव), तनपुरे एस.एम.(तलाठी, चोंभूत), शिरसाठ पी. व्ही.(तलाठी, नारायणगव्हाण), तराळ एम.बी.(तलाठी, वासुंदे), कदम दीपक(मंडलाधिकारी, भाळवणी), पवार के.टी.(मंडलाधिकारी, पळशी), मेहेत्रे डी.आर.(तलाठी, लोणी मावळा), नांगरे एस. जी.(तलाठी, वडगाव सावताळ), सारकाळे एस. बी.(तलाठी राळेगण थेरपाळ), शिंदे एस. आर.(महसूल सहायक), वैराळकर (पुरवठा निरीक्षक) आदींचा समावेश आहे.

COMMENTS