प्रतिनिधी : कोल्हापूर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापूरला जात आहेत. रस्
प्रतिनिधी : कोल्हापूर
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापूरला जात आहेत.
रस्त्यात इस्लामपूर जवळील वाघवाडी फाट्यावर एका सभेत बोलताना ते म्हणालेत की ‘माझ्या महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
ही क्रांतीची सुरुवात आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प पूर्ण केल्याशिवाय मी थांबणार नाही.’
माजी खासदार व भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम उघडली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला तर काल शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसुळ यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.
यावरून सोमय्या यांनी ठाकरे सरकारला टोमणा मारला ‘चार महिन्यात ठाकरे सरकारचे निम्मे मंत्री होतील गायब, तर निम्मे रुग्णालयात असतील!’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सरळ हल्ला करताना सोमय्या म्हणालेत की ‘उद्धव ठाकरे यांनी सगळा महाराष्ट्र भ्रष्टाचार युक्त करून टाकला आहे.
हे सगळे चोर-लुटारू आणि हत्या करणारे आहेत. माझ्याबाबत त्यांनी फार नाटके केली. वाशीमला मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मी डगमगणार नाही.
गेल्या वर्षभरात आम्ही ठाकरे सरकारचे २४ घोटाळे बाहेर काढले आहेत. त्याबाबत चौकशी आणि कारवाई सुरू झाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख गायब होतात, त्यांचा पत्ता फक्त ठाकरे आणि शरद पवार यांनाच माहीत आहे. हे सगळे भ्रष्टाचारी आहेत.
COMMENTS