‘ईडी’कडून देशमुखांच्या मालमत्तांची झाडाझडती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘ईडी’कडून देशमुखांच्या मालमत्तांची झाडाझडती

मुंबई/प्रतिनिधी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरच्या अडचणी वाढतच असून, रविवारी अमंलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून देशमुख यांच्या काटोल आणि वड

  कोळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दैनी अवस्था
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन
भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट

मुंबई/प्रतिनिधी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरच्या अडचणी वाढतच असून, रविवारी अमंलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील घरांची झाडाझडती घेतली. यावेळी ईडीने अनिल देशमुख यांचे काम पाहणारे त्यांचे दिवाणजी पंकज देशमुख यांनाही ताब्यात घेत देशमुख यांना आणखी एक धक्का दिला आहे.
नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथील निवास्थानांवर दाखल झाली. वडविहिरा हे देशमुख यांचे मूळ गाव आहे. तिथे त्याची वडीलोपार्जित शेती आहे. दरम्यान, येथे छापे टाकल्यानंतर अधिक तपासासाठी ईडीच्या पथकाने देशमुख यांचे दिवाणजी पंकज देशमुख यांना ताब्यात घेतले. दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर अनिल देशमुख यांचे समर्थक संतप्त झाले असून, सुडबुद्धीने ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
याआधीच ईडीकडून देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त केली असून, आता पुन्हा एकदा ईडीने छापा टाकल्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली. ईडीने आधीच देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त केलेली असून, अंमलबजावणी संचलनालयाने काटोल आणि वडविहिरा येथील घरांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस अधिकारी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप केलेला आहे. आरोपानंतर अनिल देशमुख ईडीच्या रडावर आले. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी केली जात असून, देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ताही जप्त केलेली आहे. ईडीने पुन्हा एकदा देशमुख यांच्या नागपूरमधील दोन घरांवर धाडी टाकल्या आहेत.
नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने रविवारी सकाळी साधारणतः आठ वाजताच्या सुमारास धाड टाकली. त्यानंतर दोन्ही घरांची झाडाझडती अधिकार्‍यांकडून सुरू असून, कारवाईचं वृत्त पसरताच देशमुख यांच्या समर्थकांनी बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी कारवाई विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. ईडीनं 16 जुलै रोजी अनिल देशमुख यांची चार कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती दिली होती. जप्त करण्यात आलेल्या 4 कोटी 20 लाखांच्या मालमत्तेमध्ये त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी आरती देशमुख आणि प्रिमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संपत्तीचा समावेश आहे. यामध्ये वरळीतील 1 कोटी 54 लाख रुपयांचा फ्लॅट आणि 2 कोटी 67 लाख रुपये किंमतीची रायगडच्या उरणमधील जमीन यांचा समावेश आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्या मदतीने मुंबईतील बारचालकांकडून अवैधरीत्या 4 कोटी 70 लाख रुपये जमा केले. तसेच, दिल्लीतील एका बनावट कंपनीच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी 4 कोटी 18 लाख रुपये जमवले असून ते श्री साई शिक्षण संस्था या ट्रस्टमध्ये आल्याचे भासवले, असे ईडीकडून सांगण्यात आले होते.

COMMENTS