इस्लामपूर येथील देवाच्या बोकडाची चोरी; माहिती देणार्‍यास दहा हजारांचे बक्षीस

Homeमहाराष्ट्र

इस्लामपूर येथील देवाच्या बोकडाची चोरी; माहिती देणार्‍यास दहा हजारांचे बक्षीस

एखाद्या मुक्या प्राण्यांचे प्राण वाचावे या भावनेतून सामजिक कार्यकर्ते मानसिंग पाटील यांनी देवाचे नाव घेऊन अंदाजे 50 हजार किमतीच्या बोकडाला शहरात सोडले.

मुंबई महानगरपालिका रुग्णालयात भूमिगत कचरा पेट्या बसवणार
टेस्लाच्या इंजिनिअरवर रोबोटचा हल्ला
रायगडमधील 211 गावांना भूस्खलनाचा धोका

इस्लामपूर / प्रतिनिधी : एखाद्या मुक्या प्राण्यांचे प्राण वाचावे या भावनेतून सामजिक कार्यकर्ते मानसिंग पाटील यांनी देवाचे नाव घेऊन अंदाजे 50 हजार किमतीच्या बोकडाला शहरात सोडले. या देवाच्या बोकडांची चोरी झाली आहे. या बोकडाची माहिती देणार्‍यास 10 हजार रुपये बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. याची माहिती देणार्‍य चे नाव गोपनिय ठेवण्यात येणार आहे. 

याबाबत माहिती अशी की, एखाद्या मुक्या प्राण्याला जीवदान द्यावे या भावनेतून आणि सामजिक बांधिलकी जोपासून सामाजिक कार्यकर्ते  मानसिंग पाटील यांनी एक बोकड उरूण परिसरात देवाच्या नावाने सोडला होता. याची चर्चाही शहरभर चांगली रंगली होती. त्यांनतर काही दिवसातच काही समाजकंटक लोकांनी बोकड चोरून बाजार केल्याची चर्चा आहे. या बोकडांची माहिती देणार्‍यास दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तरी कोणाला माहिती असल्यास संपर्क 9822152092 या क्रमांकावर साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

COMMENTS