इस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे?

Homeमहाराष्ट्र

इस्लामपूर पालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे?

महाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गटाने प्

नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयात डेंग्यू संदर्भात आढावा बैठक संपन्न
विधानसभेचे आजपासून विशेष अधिवेशन
फडणवीसांचा डेटा बाँब केंद्रीय गृहसचिवांकडे ; पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांत घोटाळ्याचे पुरावे असल्याचा दावा

महाडिक गटाची सर्व जागा लढविण्याची तयारी : विकास आघाडीत नेतृत्वावरून त्रांगडे

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत महाडिक गटाने प्रत्येक वार्डात उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हांवर लढणार असल्याचे महाडिक समर्थक सांगत आहेत. साहजिकच पालिका निवडणुकीत विकास आघाडीचे नेतृत्व कोणाकडे जाणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

इस्लामपूर नगरपालिका निवडणूकित विकास आघाडीतील भाजप काँग्रेस, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय, शिवसेना या पक्षांना एकत्र करण्याचे काम स्व. वनश्री नानासाहेब महाडिक यांनी केले होते. गेल्या तीन-चार वर्षात बरेच पाणी पूलाखालून गेले आहे. आता पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांची मोट बांधण्याचे काम कोण करणार? हा प्रश्‍न विकास आघाडी पुढे आहे. राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना,  काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षासोबत असल्याने विकास आघाडीत त्रागडे होणार असल्याची चिन्हे आजमितीला आहेत. 

पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक, माजी जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांना भाजपने राज्य पातळीवरील पदे दिली. त्यांनी पक्षवाढीसाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना शिराळा-वाळवा तालुक्यात प्रतिसादही मिळत आहे. भाजप वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी कोणतीही निवडणूक असेल तर ती भाजपच्या कमळ चिन्हांवर लढवायची असा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. त्यामुळे महाडिक गट पालिका निवडणूकीत भाजपच्या कमळ चिन्हांवर लढणार आहे. तसा दुजोराही महाडिक समर्थकांनी दिला आहे. 

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही भाजप च्या चिन्हांवर निवडणूक लढण्याचे निश्‍चित केले आहे. यामुळे भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी, मतभेद हे पुन्हा एकदा समोर आले आहेत. त्यातच महाडिक गटाने प्रत्येक वार्डनुसार आपले उमेदवार जवळपास निश्‍चित करण्याचे काम सुरू केले आहे.

महाडिक बंधूना पक्षाकडून ताकद

शिराळा विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक हे अपक्ष असताना त्यांनी 45 हजाराच्या घरात मते मिळवली होती. त्यानंतर महाडिक बंधूनी भाजप पक्षात प्रवेश केला. राहूल महाडिक व सम्राट महाडिक बंधूना वरिष्ठ नेत्यांकडून ताकद मिळत आहे. यामुळे वाळवा व शिराळा तालुक्यात भाजपला उभारी आली आहे. हे एका बाजूला असले तरी काहींना महाडिक बंधूंचा भाजप प्रवेश रुचलेला नाही.

COMMENTS