आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून रेहेकुरी पर्यटनक्षेत्राचा वनपर्यटन आराखडा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून रेहेकुरी पर्यटनक्षेत्राचा वनपर्यटन आराखडा

कर्जत : प्रा. किरण जगताप कर्जत तालुक्यातील रेहेकुरी वनपरिक्षेत्रांतर्गत रेहेकुरी काळवीट अभयारण्य तसेच कुंभेफळ पर्यटन क्षेत्राचा पंचवार्षिक वनपर्यट

संस्थेचा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्काराने सुखावलो : रामकृष्ण भिंगारे
भारतीय बौद्ध महासभेची कोपरगाव कार्यकारिणी जाहीर
जागर स्त्री शक्तीचा नवरात्रौत्सवाची उत्साहात सांगता

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील रेहेकुरी वनपरिक्षेत्रांतर्गत रेहेकुरी काळवीट अभयारण्य तसेच कुंभेफळ पर्यटन क्षेत्राचा पंचवार्षिक वनपर्यटन आराखडा तयार करण्यात आला आहे. आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्यामध्ये या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने रेहेकुरी पर्यटनक्षेत्राचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे.

‘कर्जत लाईव्ह’कडून गतवर्षी वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘करूया संवर्धन रेहेकुरी अभयारण्याचे’ या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व व पोस्टर बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या होता. आ. रोहित पवार यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले होते. त्यावेळी आ. पवार यांनी रेहेकुरी अभयारण्याचा विकास करण्याचे व्हिजन मांडले होते. त्यानुसार त्यांनी या वनपर्यटन आराखड्यात सर्वसमावेशकता आणली असून त्याच्या अंमलबजावणीतून रेहेकुरी पर्यटनस्थळ वेगळी उंची प्राप्त करणार आहे.

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये, पुणे येथील वनसंरक्षक (वन्यजीव) रमेश कुमार, सहाय्यक वनसंरक्षक दिलीप वाघचौरे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या आराखड्याची अंमलबजावणी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्याकडून करण्यात येणार आहे. वास्तुशास्त्रज्ञ जोशी हे सल्लागार म्हणून काम करत आहेत.

 पर्यटकांसाठी सोयीसुविधा, स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती, वनविभाग व गावसहभागातून पर्यटनक्षेत्रांची देखरेख तसेच वनक्षेत्र अबाधित ठेवणे हा या आराखड्याचा पाया आहे. रेहेकुरी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी जिप्सी सफारी, आधुनिक निसर्ग पर्यटन केंद्र, नवीन स्मरणिका व प्रशिक्षण केंद्र, नवीन तंबूंची निर्मिती, जुन्या तंबूंचे नविनीकरण, सायकल सुविधा, नवीन पुतळे उभारणे, परिसराचे विद्युतीकरण, नवीन चित्रफलक, सुचनाफलक आदींचा समावेश करण्यात आलेला आहे. 

या सुविधांची निर्मिती करण्यासाठी योग्य त्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आराखड्याची अंमलबजावणी होणार आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या सुविधांमुळे रेहेकुरी पर्यटन क्षेत्राची राज्यात वेगळी ओळख निर्माण होणार आहे.

COMMENTS