आ.राहुल पाटलांचे आवाहन, कार्यकर्त्यांनी धुडकावले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.राहुल पाटलांचे आवाहन, कार्यकर्त्यांनी धुडकावले

मोहन धारासूरकर परभणी-  परभणीचे विकासपुरुष आ.डॉ.राहुल पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रम हाती घ्यावे अस

बस स्टँडमध्ये घुसला बंदूकधारी पोलिसांचा ताफा…
योगेंद्र यादवांच्या कार्यक्रमात वंचितचा राडा
राज्यात पुन्हा मास्क सक्तीचे संकेत

मोहन धारासूरकर परभणी- 

परभणीचे विकासपुरुष आ.डॉ.राहुल पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रम हाती घ्यावे असे कळकळीचे आवाहन एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे आ.डॉ.राहुल पाटील यांनी केले होते. परंतू अति उत्साही कार्यकर्त्यांनी सदरील आवाहन धुडकवून लावत शहरभर बॅनरबाजी व जाहिरातीच्या माध्यमातून लाखो रूपयांची उधळण केल्याने हा विषय जिल्हाभरात चर्चेचा बनला होता.

दिनांक 14 ऑक्टोबर या दिवशी आ.डॉ.राहुल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त हारतुरे बॅनरबाजी जाहिरातीवर खर्च न करता सामाजिक उपक्रम , मोतीबिंदू शिबीर, रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांना एक लाख वही वाटप आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत साध्यापणाने साजरा करावा असा मानस आ.डॉ.राहुल पाटील यांचा होता. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर कोणीही हार-तुरे आणू नये असे आवाहन देखील वाढदिवसाचे एक दिवस अगोदन करण्यात आले होते. परंतू अतिउत्साही कार्यकर्त्यांनी या आवाहनाकडे पाठ फिरवली. आमदाराचे मोठे फोटो लावून शहरभर बॅनरबाजी करित शहराचे विद्रुपीकरण करून टाकले. खरे पाहता हे बॅनर लावतांना महानगरपालिकेची परवानगी घेतली होती काय? कि महापालिकेने या प्रकाराकडे डोळेझाक केली हे देखील पाहणे गरजेचे आहे. खरे पाहता आमदारांनी केलेल्या आवाहनात सध्या कोरोनाचे संकट गेलेले नाही जिल्हाभरात दुप्पट पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी, ढगफुटी असे अनेक घडल्याने शेतकर्‍यांचे सर्व हातातोंडाशी आलेली पीके हातातून निघून गेली आहेत. या पार्श्‍वभुमीवर माझा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे आवाहन आ.डॉ.राहुल पाटील यांनी करून देखील जे व्हायचे तेच झाले. आ.डॉ.राहुल पाटील हे सामाजिक भान ठेवणारे आमदार आहेत. परभणी जिल्हयात त्यांनी अनेक विकासाची कामे केली आहेत. आणि करित आहेत परंतू एैन दुष्काळी परिस्थितीत कार्यकर्त्यांना आवर घालण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील परिस्थितीचे भान ठेवून वागणे गरजेचे होते. येथून पुढे तरी परिस्थिती पाहून कार्यकर्त्यांच्या वागणुकीत फरक पडेल अशी आशा ठेवायला हरकत नाही.

चौकट

चहा पेक्षा किटली गरम, आमदार नरम पीए गरम

आ.डॉ.राहुल पाटलांच्या अनेक पीए पैकी एक पीए वाढदिवसाच्या अगोदर एक दिवस मोजक्या दैनिकाला जाहिराती देण्यासाठी अटापिटा करित होता. दैनिकाच्या कार्यालयातच ठाण मांडून बसला होता. त्याने एक – दोन दैनिकांना पाने भरू-भरून खिरापती सारख्या वाटल्या. तर अनेक दैनिकांकडे कानाडोळा केला. जेथे आमदाराच्या पीएनेच आमदाराचे आवाहन धुडकावले तेथे उत्साही कार्यकर्त्यांना नावे ठेवून काय फायदा? यामुळे पीए म्हणजे चहा पेक्षा किटली गरम अशी म्हण्याची वेळ आली आहे. आमदारांच्या विकास कामांच्या बातम्या न चुकता सर्व दैनिकांना पोहचत्या केल्या जातात परंतू जाहिरात देण्याची वेळ आली की, काही मोजके दैनिक सोडले तर इतर दैनिकांना जाहिरातीपासून वंचित ठेवण्याचे पाप हे सदरील पीए करित असल्यामुळे या पीएलाच आ.डॉ.राहुल पाटील यांनी आवर घालावा. 

COMMENTS