सांगली - आषाढी वारी( Ashadhi Wari) करून परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याचं समोर आलं आहे. टेम्पो उलटून घडलेल्या अपघातामध्ये दहा वार
सांगली – आषाढी वारी( Ashadhi Wari) करून परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याचं समोर आलं आहे. टेम्पो उलटून घडलेल्या अपघातामध्ये दहा वारकरी जखमी झाले आहेत . तासगाव(Tasgaon) तालुक्यातील मनेराजुरी(Manerajuri) या ठिकाणी हा अपघात घडला. जखमींना तातडीने सांगली(Sangli) आणि मिरज(Miraj) येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा(Shirala) तालुक्यातील भागाईवाडी(Bhagaiwadi) व परिसरातील 60 वारकरी हे आषाढीवारी(Ashadhiwari) निमित्ताने पंढरपूरला( Pandharpur) गेले होते . आषाढी वारी संपल्यानंतर पुन्हा गावी परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला .

COMMENTS