आषाढी यात्रा : पंढरपूरसह १० गावांत सात दिवस संचारबंदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आषाढी यात्रा : पंढरपूरसह १० गावांत सात दिवस संचारबंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेनिमित्त १७ ते २५ जुलै या सात दिवसांच्या कालावधीत पंढरपूर शहरासह परिसरातील दहा गावांत संचारबंदीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

दुचाकीस्वारांना लुटणार्‍या दोघांना पकडले ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15 हजारांचा गंडा घालणार्‍या भोंदूविरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा
डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत सातबारा वितरणाचा कर्जत तालुक्यात शुभारंभ

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेनिमित्त १७ ते २५ जुलै या सात दिवसांच्या कालावधीत पंढरपूर शहरासह परिसरातील दहा गावांत संचारबंदीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. प्रशासनाच्या या प्रस्तावाला सरकारनेही हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे. लवकरच आदेश निघण्याची शक्यता आहे. यंदा सर्व मानाच्या दहा पालख्या एसटी बसने दशमीदिवशी पंढरपुरात येणार आहेत. 

    पौर्णिमेला परत जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सात दिवस संचारबंदीचा प्रस्ताव पाठवला आहे. या काळात जिल्हा, पंढरपूर तालुका आणि शहर अशी त्रिस्तरीय नाकेबंदी करण्यात येणार आहे. परवानगी दिलेल्या भाविकांशिवाय अन्य कोणालाही पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही. परवानगी नसताना यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विनंती करून त्यांच्या गावी परत पाठवले जाणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले. आषाढी यात्राकाळात चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी येऊ नये, यासाठी नदी परिसरात १४४ कलम लागू केले जाणार आहे. सरकारने परवानगी दिलेल्या भाविकांनाच पास देण्यात येतील. त्यांना नगरप्रदक्षिणा आणि विठ्ठल मंदिरात सोडण्यात येईल. याशिवाय पंढरपूर शहरातील नागरिकांनाही बाहेर पडता येणार नाही. जिल्ह्यात कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे ही खबरदारी घेतली जात आहे. प्रशासनाच्या प्रस्तावाला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. लवकरच याविषयी आदेश निघेल, असेही पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

COMMENTS