आरोग्य पत्रिकेनुसार पिकांना  खते देण्यासाठी जनजागृती सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्य पत्रिकेनुसार पिकांना खते देण्यासाठी जनजागृती सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी-यंदा राज्यात खरीप हंगामापासून कृषी विभाग पिकांना रासायनिक खताच्या मात्रा जमीन आरोग्यपत्रिकेनुसार देण्याबाबत शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणार आहे.

तुमचे आजचे राशीचक्र सोमवार, २१ जून २०२१ l पहा LokNews24
सावकाराने लिहून घेतलेली जमीन पोलिसांमुळे मिळाली परत
निळवंडेच्या उजव्या कालव्यातून मिळणार पाणी

अहमदनगर/प्रतिनिधी-यंदा राज्यात खरीप हंगामापासून कृषी विभाग पिकांना रासायनिक खताच्या मात्रा जमीन आरोग्यपत्रिकेनुसार देण्याबाबत शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणार आहे. खरीपातील मार्गदर्शक सूचनांत त्याबाबत उल्लेख केला असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले. शेतीमालाचे उत्पादन वाढीसाठी बहुतांश भागात रासायनिक खताचा गरजेपेक्षा अधिक वापर होत आहे. त्याचा परिणाम शेतीच्या आरोग्यावर, पीक उत्पादन आणि उत्पादन खर्चावरही होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे रासायनिक ख़ते वापराबाबत जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. 

शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे तसेच उत्पादन खर्च कमी करण्याबाबत सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कृषी विभागाकडून जमिनीतील उपलब्ध घटकाची तपासणी करून कोणत्या खताचा किती प्रमाणात वापर करावा, याबाबत शेतकर्‍यांना माहिती व्हावी यासाठी जमीन आरोग्य पत्रिका दिल्या आहेत. त्यातील शिफारशीनुसारच खताच्या मात्रा द्याव्यात, असे सांगितले असले तरी बहुतांश शेतकरी त्याबाबत फारसे गांभीर्याने घेताना दिसत नाहीत, असे कृषी विभागाचे निरीक्षण आहे. बेसुमार रासायनिक खताचा वापर केल्याने अनेक वेळा खतटंचाईलाही सामोरे जावे लागते. राज्यातील अनेक जिल्ह्यांत खताच्या असमतोल वापरामुळे जमिनीचेही आरोग्य बिघडत चालले असून, भौतिक गुणधर्म आणि सूक्ष्म जीवाणूंचीच संख्या कमी होत चालली आहे. शेतकर्‍यांना अधिक नफा मिळणे गरजेचे असले तरी खतांवरील खर्च वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ होत आहे, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी खते वापराच्या शिफारशीचा अवलंब करून सूक्ष्म अन्नद्रव्ये, शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीच्या खतांचा वापरही करावा तसेच रासायनिक खतांचा वापर कमी ठेवावा, सोयाबीन पिकामध्ये वाढ व्हावी म्हणून युरिया खताचा दुसर्‍या डोससाठी वापर कमी करावा. आरोग्य पत्रिकेच्या शिफारशीनुसार जर खतांची कमतरता असेल तर शिफारशीच्या 1.67 पट खतांचा वापर करावा, मध्यम असेल तर शिफारशीप्रमाणे खतांचा वापर करावा. जमीन सुपीकता निर्देशांकात खताचे प्रमाण भरपूर असेल, तर शिफारशींच्या 0.66 पट खतांचा वापर कमी करावा आणि जमीन निर्देशांकात खतांचे प्रमाण अत्यंत जास्त असेल तर खतांचा वापर 0.33 पट कमी करावा, याबाबत यंदा कृषी विभागाने राज्यात खत वापराबाबत शेतकर्‍यांत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS