आपल्या राष्ट्रीय खेळाचा दुष्काळ भारतीय संघाने संपवला- छगन भुजबळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आपल्या राष्ट्रीय खेळाचा दुष्काळ भारतीय संघाने संपवला- छगन भुजबळ

नाशिक: भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. आपला राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीमधला दुष्काळ भारतीय संघाने संपवला असल्याची भावना व्यक्त करतानाच राज्याचे

कोरोनामुक्त गावांतील 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू होणार : छगन भुजबळ
ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्य सरकारकडून दुहेरी प्रयत्न – छगन भुजबळ
कोरोना रुग्णसंख्या स्थिर असली तरी नागरिकांनी सतर्क राहावे : छगन भुजबळ

नाशिक: भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. आपला राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीमधला दुष्काळ भारतीय संघाने संपवला असल्याची भावना व्यक्त करतानाच राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पुरुष हॉकी संघाचे ऑलिंपिक मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
भुजबळ म्हणाले की कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 असा विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने हॉकीमधला 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे. तब्बल 41 वर्षानंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात पदक जिंकलं संपूर्ण भारतीयांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. भारतीय खेळाडू ऑलिंपिक मध्ये घेत असलेल्या मेहनतीबद्दल सुद्धा खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले पाहिजे. सर्वांचे कौतुक करतानाच ऑलिंपिक मधल्या सर्व भारतीय खेळाडूंना भविष्यातील सर्व सामन्यांसाठी शुभेच्छा देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

COMMENTS