आधी ‘पूर्ण राज्य’ नंतरच निवडणूक;  ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांची भूमिका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आधी ‘पूर्ण राज्य’ नंतरच निवडणूक; ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांची भूमिका

जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घ्यायच्या असतील, तर आधी त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देणे आवश्यक आहे.

अश्‍लील मजकुराच्या चिठ्ठ्या घरात टाकून महिलेचा विनयभंग
कल्याणकारी व्यवस्थेचा अभाव !
स्कॉर्पियोने बाईक रायडरला दिली जोराची धडक, हा Video एकदा पाहाच ! | LOK News 24

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घ्यायच्या असतील, तर आधी त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देणे आवश्यक आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना तसे स्पष्टपणे कळविले आहे. याबाबत कोणत्याही प्रकारच्या नव्या कालमर्यादेचा स्वीकार करण्यात येणार नाही, असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

ओमर म्हणाले, की त्या बैठकीमध्ये आम्हा सर्वांच्या वतीने गुलाब नबी आझाद यांनी आपले म्हणणे मांडले. कोणत्याही स्थितीमध्ये आम्ही कालमर्यादा स्वीकारणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. आधी मतदारसंघांची फेररचना केल्यानंतर पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि नंतर निवडणुका घेतल्या जाव्यात. तुम्हाला राज्यात निवडणुका घ्यायच्या असतील तर आधी तुम्ही पूर्ण राज्याचा देणे गरजेचे आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी 370 वे कलम आणि कलम 35 (अ) पुन्हा लागू होत नाही, तोपर्यंत निवडणुका लढणार नाही असे म्हटले आहे. मेहबूबा यांच्या म्हणण्याला ओमर अब्दुल्ला यांनी दुजोरा दिला. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची हीच मागणी आहे. केवळ मेहबूबा मुफ्ती यांनीच नाही, तर फारुख अब्दुल्ला यांनीदेखील याचा पुनरुच्चार केला आहे. 370 वे कलम रद्द करण्यात भाजपला यश आले असले, तरीसुद्धा आम्ही माघार घेणार नाही, यासाठी 70 आठवडे, 70 महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ लागला तरी देखील हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS