कोरोनाच्या वैश्विक महामारीने थैमान घातले असताना,अनेकांनी कोरोनाशी झुंज देत असताना आपले प्राणही गमावले आहे.
कोपरगाव प्रतिनिधी -कोरोनाच्या वैश्विक महामारीने थैमान घातले असताना,अनेकांनी कोरोनाशी झुंज देत असताना आपले प्राणही गमावले आहे.अशातच कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक रुग्णालय संचालितव्दारा एव्हर हेल्दी रुग्णालयाने नुकतीच मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया करण्याचे आवाहन केले असताना आता या रुग्णालयाचे वैद्यकीय तज्ञ डॉ.अनिल शामराव माने कोरोनातुन सावरलेल्या रुग्णांस विनामुल्य सल्ला देणार आहे. आत्मा मालिक रुग्णालयातील डॉ. अनिल माने ( MD ,COVID EXPERT ) असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड पाश्च्यात केंद्र दि १ मे २०२१ पासून चालू करण्यात आले आहे . डॉ माने यांच्या पाठीशी प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे कोविड पाश्च्यात मार्गदर्शन दैनंदिन सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत आत्मा मालिक रुग्णालयात देणार आहे.तरी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी या मार्गदर्शनाचा फायदा करुन घेण्याचे आवाहन रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी अमित फरताळे यांनी केले आहे.
COMMENTS