आत्महत्येचा विचार करणे योग्य नाही : अण्णा हजारे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आत्महत्येचा विचार करणे योग्य नाही : अण्णा हजारे

पारनेर/ प्रतिनिधी : व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर आज पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भे

देशाच्या विकासात शिक्षकांचे योगदान-अरविंद धिरडे
पोलिसांचा आणखी एक दणका…कर्जतच्या टोळीवरही मोक्का
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून..

पारनेर/ प्रतिनिधी : व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर आज पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेतली. यावेळी आत्महत्येचा विचार करणे योग्य नाही. तो डोक्यातून काढून पुढील वाटचाल करा असा सबुरीचा सल्ला हजारे यांनी यावेळी तहसिलदार देवरे यांना दिला. आज सकाळी तहसिलदार देवरे यांनी हजारे यांची भेट घेत  त्यांना यावेळी राखी बांधली व तुमचे आशिर्वाद मला असू द्या अशी विनंती केली. अशी माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिली. त्यावर अण्णा म्हणाले की, खरे तर मला ह्या वादात पडायचे नाही मात्र जीवनात संकटे येतच असतात त्याला न घाबरता धैर्याने सामोरे गेले पाहिजे. संकटावर मात केली पाहिजे. कारण मनुष्य जन्म हा एकदाच आहे. आपले चारित्र्य शुद्ध ठेवले आणि तुकाराम मुंढे या अधिकाऱ्यासारखे न डगमगता काम चालू ठेवले तर संकटे आपलं काही करू शकत नाही.
चौकट : मी माझा संघर्ष लढण्याची तयारी केली आहे. फक्त मला लढ म्हणा व माझ्यावर तुमचा आशिर्वाद कायम असो. मी महिला असल्यामुळे त्रास होतोय कदाचित मी पुरुष असते तर मला त्रास झाला नसता. मी भ्रष्टाचार केलेला नाही तो पुढे जाऊन सिध्द होईल. चौकशी समितीसमोर माझी जायला माझी तयारी आहे मात्र ती चौकशी वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडून व्हायला पाहिजे. – ज्योती देवरे, तहसिलदार पारनेर

COMMENTS