आता महाराष्ट्रातचं रेमडेसिव्हीर निर्मिती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता महाराष्ट्रातचं रेमडेसिव्हीर निर्मिती

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज भर पडते आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढली आहे.

LokNews24 l अहमदनगर जिल्ह्याचा आढावा
हतेडी बु. येथिल अवैध दारूविक्री बंद करा
जनताच सर्वोतोपरी ! 

वर्धा/प्रतिनिधीः कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज भर पडते आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. त्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. आता वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीतील जेनेटिक लाइफ सायन्सेस ही कंपनीही रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करणार आहे. 

देशभरात रेमडेसिवीर हे औषध तयार करणार्‍या मोजक्याच कंपन्या आहेत. यात वर्ध्यातील आणखी एका कंपनीचा समावेश होणार आहे. जेनेटिक सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून हे उत्पादन करण्यात येणार आहे. कंपनीला उत्पादनासाठी परवानगी मिळणे ही वर्धा जिल्हावासीयांंसाठी आनंदाची बाब आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी पुढाकार घेतला. या कंपनीला रेमडेसिवीर उत्पादन निर्मितीस परवानगी मिळावी, यासाठी गडकरी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. जेनेटिक लाइफ सायन्सेस प्रा. लि. या कंपनीचे प्रमुख संशोधक आणि वैज्ञानिक डॉ. एम. डी. क्षीरसागर हे आहेत. कंपनीत लाइफ सेव्हिंग ड्रग्ज क्रिटिकल केअर इंजेक्शन्स, अँजिओग्राफीमध्ये वापरली जाणारी उत्पादने, सीटी स्कॅन, एमआरआय आणि आणीबाणीच्या वापरासाठीची उत्पादने बनवली जातात. या कंपनीत लवकरच रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू होणार आहे. रोज 30 हजार व्हायल तयार करण्याचा दावा केला जात आहे. रेमडेसिवीर उत्पादनात देशाला याचा फायदा होणार आहे.

COMMENTS