आठ दिवसात बुलडाण्याचे कोविड रूग्णालय 500 बेड चे कराः आ. संजय गायकवाड

Homeमहाराष्ट्रबुलढाणा

आठ दिवसात बुलडाण्याचे कोविड रूग्णालय 500 बेड चे कराः आ. संजय गायकवाड

जिल्हा रूग्णालयाअंतर्गत असलेल्या कोविड 19 रूग्णालयात रूग्णांना बेड मिळत नाही, आरोग्य सुविधांचा अभाव आहे अश्‍या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आ.

तो व्यक्ती शेतकरी नसून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे – आ. संजय गायकवाड  
बुलडाणा जिल्ह्यात धावली पहिली लालपरी, चोख पोलीस बंदोबस्तात बस आगारातून बाहेर | LOKNews24
राज्यात 108 रुग्णवाहिकांची संख्या दुपटीने वाढणार

बुलडाणा, (प्रतिनिधी) :  जिल्हा रूग्णालयाअंतर्गत असलेल्या कोविड 19 रूग्णालयात रूग्णांना बेड मिळत नाही, आरोग्य सुविधांचा अभाव आहे अश्‍या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आ. संजय गायकवाड यांनी आज जिल्हा कोरोना रूग्णांलयाची झाडाझडती घेवुन कोरोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेता येत्या आठ दिवसात आणखी दोन कोवीड सेंन्टर उघडुन बेडची संख्या 500 पर्यंत करण्याचे निर्देश आ. संजय गायकवाड यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाशल्यचिकित्स श्री. तडवी, डी.एच.ओ. श्री. सांगळे, बांधकाम विभागाचे जेई दांदडे, विद्युत निरीक्षक, शासकीय कंत्राटदार शेवाळे मामा, ऑक्सिजन पुरवठादार अहमद आदी उपस्थित होते. 

यावेळी आ. संजय गायकवाड यांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या अपंग विद्यालयातील व क्षयआरोग्य धाम येथील कोविड रूग्णालयाची पाहणी केली. दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना कोविडचे वाढते रूग्णासंदर्भात अतिरिक्त बेड संख्या वाढविण्यास सांगीतले. येत्या आठ दिवसात ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र जेल रोड व आय.टी.आय. कॉलेज येथे सुध्दा अतिरिक्त कोविड रूग्णालय सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले. ऑक्सीजनचा व रेडमिसीरीज इंजेक्शन तसेच इतर औषधांचा मुबलक साठा ठेवुन रूग्णांना चांगल्यात चांगली सेवा देण्याचे सांगीतले. आपल्याला राज्य शासन किंवा वरिष्ठ पातळीवरून काही मदत लागत असेल्यास आपण आरोग्य मंत्री  यांच्याशी चर्चा करून त्या तात्काळ पुर्ण करण्याकरीता प्रयत्न करू असे ठोस आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.
आ. संजय गायकवाड यांनी डॉक्टर यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आरोग्य कर्मचारी, सफ ाई कर्मचारी व रूग्णांचे नातेवाई यांच्याशी सुध्दा चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या. त्याही आपण शासन स्थरावरून तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करून असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

COMMENTS