आठ जिल्ह्यांत निर्बंध ; पुणे, मुंबई, नगरचाही समावेश; कडक टाळेबंदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आठ जिल्ह्यांत निर्बंध ; पुणे, मुंबई, नगरचाही समावेश; कडक टाळेबंदी

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यामध्ये निर्बंध लावण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

कृषीदूतांनी ड्रोनद्वारे केले कीटकनाशकांची फवारणीचे प्रात्यक्षिक
चार वर्षाच्या बालिकेवर नराधमाचा बलात्कार
पुणतांबा परिसरातील बंधारे व पाझर तलाव ओव्हरफलोच्या पाण्याने भरून द्यावे ः विवेक कोल्हे

मुंबई / प्रतिनिधी: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यामध्ये निर्बंध लावण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये देशात टॉप टेनमध्ये असलेल्या पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर, या आठ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागण्याची शक्यता आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 30 मार्चला पत्रकार परिषद घेऊन देशातील सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीमधील टॉप टेन जिल्ह्यांची माहिती दिली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांचा समावेश होता. त्याचे आठ जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सूचित केले. कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या ही चिंता वाढवणारी आहे. या अनुषंगाने संपूर्ण आढावा घेण्याचे काम सुरू आहे. बेड्स, आैषधे, ऑक्सिजन याबाबत चर्चा सुरू आहे. कुठे काय उणिवा आहे, त्याबाबत व्यापक चर्चा झाली. ज्या ठिकाणी निर्बंध पाळले जात नाही, तिथे अधिक निर्बंध लागू करून गर्दी कशी टाळली जाईल याबाबत चर्चा झाली. निर्बंधावर योग्य अंमलबजावणी होण्याची गरज आहे. याबाबत चर्चा करून निर्णय होईल. अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. टाळेबंदी हा शब्द न वापरता निर्बंध लावले आहेत. सरकारी कार्यालये वर्क फ्रॉम होम केले आहेत. रात्रीची संचारबंदी लावली आहे. निर्बंध लावल्यानंतर गर्दी वाढते  आहे. त्यामुळे कडक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याबाबत बारकारने निर्णय घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. लोकांनी काही दिवस नियमांचे पालन केले, तर टाळेबंदी लावण्याची गरज भासणार नाही. ज्यावेळी संसाधने संपतात, त्या वेळी साखळी तोडण्यासाठी तातडीचा इलाज हा टाळेबंदी असते. लोक स्वयंशिस्त पाळत नसल्याने निर्बंध कडक करावे लागत आहेत. लगेच चाचणी केली नाही तर तरुणांनाही ऑक्सिनज बेड्सची गरज लागत आहे. लक्षणे दिसली की तातडीनी चाचणी करा. ज्यांना बेड्सची आवश्यकता नाही, त्यांनी आयसीयूचा बेड घेऊ नये. याबाबतच्या सूचना बैठकीत आम्ही देतो आहे, असे टोपे यांनी सांगितले. सगळ्या संसाधनाचा व्यवस्थित पुरवठा व्हावा त्याबाबत चर्चा सुरू  आहे. पुण्यात जो निर्णय झाला तो वरिष्ठ स्तरावर चर्चा करून निर्णय घेतला. पुण्यात निर्बंध लावणे गरजेचे होते;. पण तसे सर्वदूर लावले असे नाही. कोणत्या जिल्ह्यात निर्बंध लावले पाहिजेत, तेही महत्त्वाचे आहे. देशातील टॉप आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत.

उणिवा दूर करू

लोकलबाबतही आढावा घेतलेला आहे. त्याही बाबतही काही मार्गदर्शक सूचना जाहीर होतील. कसे राहावे, याबाबत सूचना दिल्या जातील. कोणत्याही परिस्थितीत संसर्ग टाळावे. महाराष्ट्रात आरोग्याची व्यवस्था ठीक आहे. काही उणिवा आहेत. त्याबाबतच निर्णय घेतला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS