आठवलेंचे मुस्लिम कार्ड… म्हणाले, मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याची गरज

Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

आठवलेंचे मुस्लिम कार्ड… म्हणाले, मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याची गरज

प्रतिनिधी : मुंबई मुस्लिमांना राजकारणात धार्मिक आधारावर नव्हे तर अल्पसंख्याक समुदाय म्हणून राजकीय प्रतिनिधित्व द्या, अशी सूचना केंद्रीय मंत्री

डिझेल वितरकांनी चालवलीय ब्लॅकमेलिंग !
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करा
मालमत्ता कराची 200 कोटींची थकबाकी वसूल

प्रतिनिधी : मुंबई

मुस्लिमांना राजकारणात धार्मिक आधारावर नव्हे तर अल्पसंख्याक समुदाय म्हणून राजकीय प्रतिनिधित्व द्या, अशी सूचना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. 

ते बुधवारी परिक्रमा मार्ग गोपाळखार येथील श्री राधाप्रसाद धाम येथे आयोजित संगीत शिरोमणी स्वामी हरिदास आविर्भाव महोत्सवात बोलत होते. 

पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणालेत की ‘राजकीय पक्षांनी मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याचा विचार केला पाहिजे, पण तो धर्मावर नव्हे तर अल्पसंख्याक समुदाय असावा. 

आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटींसह उत्तर प्रदेशात उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. 

रामदास आठवले मंगळवारी गाझियाबादमध्ये होते. २६ तारखेपासून उत्तर प्रदेशमध्ये ते ‘आरपीआय बहुजन कल्याण यात्रा’ काढणार आहेत. सहारनपूरपासून सुरू होणारी ही यात्रा उत्तर प्रदेशच्या ७५ जिल्ह्यांमध्ये फिरेल.

COMMENTS