आज १८ जुलै   आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

Homeदेशधर्म

आज १८ जुलै आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

नमस्कार , मी सोमनाथ मान्ग्थ जंगम

मेष:मानसिक व्यग्रता जाणवेल. अतिविचार करू नका. लबाड लोकांच्यावर विश्वास ठेऊ नका. नसत्या वादात लक्ष घालू नका.  शुभ रंग विटकरी  शुभ अंक ७  वृषभ:

भारतावर दहशतवादी हल्ल्याचं सावट l LokNews24
निवडणूक प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी हे आयोगाचे वैशिष्ट्य : मुख्य निवडणूक आयुक्त
उत्तरप्रदेशात उद्या शेतकऱ्यांची ‘किसान महापंचायत’… आम्हाला रोखू शकत नाही : टिकैत यांचा इशारा

मेष:

मानसिक व्यग्रता जाणवेल. अतिविचार करू नका. लबाड लोकांच्यावर विश्वास ठेऊ नका. नसत्या वादात लक्ष घालू नका.  शुभ रंग विटकरी  शुभ अंक ७ 

वृषभ:-

वेळेचे बंधन पाळावे लागेल. घाई गडबडीत कामे उरकू नका. कौटुंबिक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा होतील. सर्वांशी प्रेमाने संवाद साधाल. शुभ रंग पांढरा   शुभ अंक ४ 

मिथुन:-

मनात विचारांचा गोंधळ उडेल. ठामपणे निर्णय घेण्यासाठी मदतीची गरज भासेल. अनाठायी खर्च केला जाईल. मानसिक द्विधावस्थेतून बाहेर यावे लागेल. कौटुंबिक खर्चाचे गणित जुळवावे लागेल.शुभ रंग विटकरी  शुभ अंक २ 

कर्क:-

लहानशा अपयशाने खचून जाऊ नका. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. मानभंगाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. कामात चिकाटी आणावी लागेल. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.शुभ रंग निळा  शुभ अंक ६ 

सिंह:-

जवळचे मित्र भेटतील. कामात त्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण केली जाईल. तुमच्यातील अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील.शुभ रंग हिरवा  शुभ अंक ८ 

कन्या:-

अधिकारी मंडळींच्या सल्ल्याने वागावे. दूरच्या कामातून लाभ संभवतो. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ संभवतो. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल. शुभ रंग काळा  शुभ अंक ३ 

तूळ:-

सरकारी कामात अधिक काळ गुंतून पडाल. मोठ्या ,प्रतिष्ठित लोकांच्यात ऊठबस राहील. नवीन विचारांनी भारावून जाल. नवीन संधीची कामना कराल. अचानक धनलाभाची शक्यता.शुभ रंग नारंगी  शुभ अंक ९ 

वृश्चिक:-

जोडीदाराशी वैचारिक मतभेद संभवतात. पत्नीच्या मताप्रमाणे जावे लागेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. त्यांना मदतीचा हात पुढे कराल. हातातील कामाला गती मिळेल.शुभ रंग पिवळा  शुभ अंक ४ 

धनू:-

मनात अनामिक चिंता निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. सहकारी तुम्हाला अपेक्षित मदत करतील. कामगारांकडून कामे सुरळीत पार पडतील. शुभ रंग लाल   शुभ अंक ३ 

मकर:-

उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सुस्वभावी लोकांच्यात वावराल. नवीन मित्र जोडता येतील. दिवस आनंदात जाईल. करमणुकीच्या साधनांचा आनंद घ्याल.शुभ रंग पोपटी   शुभ अंक ८ 

कुंभ:-

स्थावरच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल. हित शत्रूंवर मात करता येईल. तुमच्या यशाने विरोधक शांत होतील. केलेल्या कामाची चोख पावती मिळेल.शुभ रंग गुलाबी  शुभ अंक ७ 

मीन:-

वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल. अन्यथा त्रासाला कारण ठरू शकते. तुमचे कौशल्य पणाला लागू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.शुभ रंग काळा  शुभ अंक ५ 

COMMENTS