आघाडीतील प्रत्येक जण सत्तेचे लचके तोडत आहे… फडणवीसांचा घणाघात…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आघाडीतील प्रत्येक जण सत्तेचे लचके तोडत आहे… फडणवीसांचा घणाघात…

प्रतिनिधी : नागपूरआघाडीतील प्रत्येक जण सत्तेचे लचके तोडत आहे. प्रत्येक जण सुभेदार असल्यासारखे वागत आहे. नाही लचके तोडता आले तर एकमेकांचे लचके तोडा अश

पाचशेवर कामगारांची झाली एचआयव्ही तपासणी; अमृतदीप प्रकल्पात स्थलांतरीतांना आरोग्य मार्गदर्शन
भारतीय क्रिकेटची ब्राह्मणी परिक्रमा!
पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देणार

प्रतिनिधी : नागपूर
आघाडीतील प्रत्येक जण सत्तेचे लचके तोडत आहे. प्रत्येक जण सुभेदार असल्यासारखे वागत आहे. नाही लचके तोडता आले तर एकमेकांचे लचके तोडा अशा प्रकारची अवस्था या आघाडीची झाली आहे, असा घणाघात फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जनतेचा जीव जातो, अशा शब्दांत भाजपावर टीका केली होती.

त्यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री काय बोलले यावर मी काहीही बोलणार नाही. समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं.

मग आम्हाला सांगावं, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. ही आघाडी फक्त आणि फक्त सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून लूक आऊट नोटीस मिळाल्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, मलाही तुमच्या माध्यमातूनच ही माहिती मिळाली की ईडीने अनिल देशमुखांविरोधात अशा प्रकारची लूक आऊट नोटीस जारी केली आहे.

उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाल्यानंतर आता कायद्याच्या दृष्टीने चौकशीला सामोरं जाणं अधिक उत्तम होईल. तसाच निर्णय त्यांनी घ्यायला हवा, असा सल्लाही फडणवीसांनी दिला.

COMMENTS