कर्जत : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या राशीन तसेच कुळधरण येथील श्री जगदंब
कर्जत : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या राशीन तसेच कुळधरण येथील श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
राशीन येथील मंदिरात अक्कप्पा स्वामी जंगम यांचे वंशज योगेश शेटे यांच्या हस्ते देवीच्या मंदिरामध्ये घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी मंदिराचे सेवेकरी, पुजारी जगदीश रेणूकर, विशाल रेणूकर, अरुण रेणूकर, श्रीकांत रेणूकर, शिवदास शेटे, ग्रामजोशी संदीप सागळे, ट्रस्टचे अध्यक्ष निळकंठ देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते. कुळधरण येथे बिभीषण पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
काल रात्रीपासूनच राशीन, कुळधरण येथून नगर, सोलापूर, पुणे, बीड या जिल्ह्यासह राज्यभरातून देवीची ज्योत घेऊन जाण्यासाठी सवाद्य तरुणांचे जथ्थे येत होते. घटस्थापनेच्या दिवशी दिवसभर ज्योत घेऊन जाण्यासाठी विविध ठिकाणाहून युवक येत होते. राशीन व कुळधरण येथील देवी मंदिर परिसरात शासकीय नियमांचे पालन करून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शेकडो लोक घटी बसलेले आहेत.
COMMENTS