Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात; अटकेची कारवाई सुरू

सातारा / प्रतिनिधी : सातारचे खा. उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या विषयी ‘अफजलाच्या औलादी, मी असल्या गादींच्या छत्रपतीं

बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग तात्पुरता जागा
सातारा-म्हसवड-माळशिरस चौक रस्ता दुरुस्तीची मागणी
सातारा पालिकेच्या पॉवर हाऊस येथे 20 मेगावॅटच्या वीज निर्मिती उपकेंद्रास मंजूरी

सातारा / प्रतिनिधी : सातारचे खा. उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या विषयी ‘अफजलाच्या औलादी, मी असल्या गादींच्या छत्रपतींना मानत नाही, असे बोलून ऐन मराठा आरक्षणाच्या काळात खळबळ उडवून देणार्‍या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गुरुवारी सातार्‍यात आणले. त्यांच्यावर आता अटकेची कारवाई सुरू असून कोर्टात कधी हजर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सातार्‍यात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
अ‍ॅड. सदावर्ते यांच्याविरुध्द सातारा पोलीस ठाण्यात सन 2020 मध्ये तक्रारदार राजेंद्र निकम (रा. तारळे, ता. पाटण) यांनी तक्रार दिली होती. एका टीव्ही चॅनेलवर अ‍ॅड. सदावर्ते यांनी दोन्ही राजेंविषयी बेताल वक्तव्य केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत तीन पोलीस तपासी अधिकारी नेमण्यात आले आहेत. सध्या पोनि वंदना श्रीसुंदर या तपासी अधिकारी आहेत.
गुरुवारी आर्थर जेलमधून अ‍ॅड. सदावर्ते यांचा पोलिसांना ताबा घेतला. ट्रान्झिट रिमांडवर सातार्‍यात आणल्यानंतर आता त्यांना अटक केली जाईल. यावेळी अटक पंचनामा करून संशयित आरोपी अ‍ॅड. सदावर्ते यांची वैद्यकीय तपासणी (मेडिकल) करण्यासाठी त्यांना सिव्हिलमध्ये नेले जाईल. यानंतर कायद्यातील तरतूदीनुसार अटक केल्यानंतर संशयिताला 24 तासात कोर्टात हजर केले जाते.

COMMENTS