अहिरे येथील एकशे आठ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात; लोणंदच्या स्वामी समर्थ हॉस्पिटलचे विशेष कौतुक

Homeमहाराष्ट्रसातारा

अहिरे येथील एकशे आठ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात; लोणंदच्या स्वामी समर्थ हॉस्पिटलचे विशेष कौतुक

अहिरे, ता. खंडाळा येथील दादासाहेब बापूराव धायगुडे या एकशे आठ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा विचाराधीन
द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माने घेतलं सुशांत सिंह राजपुतचं घर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातली नैतिक पातळी राखली पाहिजे – संजय राऊत 


लोणंद / वार्ताहर : अहिरे, ता. खंडाळा येथील दादासाहेब बापूराव धायगुडे या एकशे आठ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. आजोबांच्या या यशस्वी लढाईचे विशेष कौतुक होत असून लोणंद येथील स्वामी समर्थ हॉस्पिटलचेही विशेष अभिनंदन केले जात आहे. गेली काही दिवस म्हणजे दि. 18 मे पासून दादासाहेब धायगुडे हे लोणंद, ता. खंडाळा येथील स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये कोरोना वर उपचार घेत होते. हॉस्पिटलचे डॉ. मकरंद डोंबाळे आणि डॉ. उमेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची संपूर्ण टीम कार्यरत असताना या आजोबांवर उपचार करण्यात येत होते. डॉक्टरांचे व त्यांच्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नाने तसेच आजोबांच्या चांगल्या प्रतिसादाने हे उपचार यशस्वी करण्यात आले आहेत.

आजोबांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर आजोबांचा स्कोर हा 9 होता. 108 वय असणार्‍या आजोबांनी कोरोनाशी सामना करणे म्हणजे हे एक मोठे आव्हानच होते. 16 मे आणि 17 मे रोजी ताप येणे, अंग भरून येणे, तोंडाची चव गेलेली, जेवण कमी झाले.

अशा परिस्थितीत त्यांचे नातू डॉ. उत्कर्ष धायगुडे यांनी त्यांची कोरोना चाचणी अहिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केली असता ती पॉजिटिव्ह आली होती. रक्ताच्या काही चाचण्या ही करण्यात आल्या होत्या. ऑक्सिजनचे प्रमाण 90 ते 92 टक्के जाणवल्याने त्यांना स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत तरुणांपासून ते अगदी वयोवृध्दांपर्यंत अनेकांना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे 108 वर्षीय आजोबांनी या कोरोनाच्या विरोधात लढत असताना कोरोनावर केलेली मात ही नक्कीच एक प्रेरणादायी व अनेक कोरोना बाधित रुग्णांसाठी दिलासा देणारी बाब ठरते आहे.

डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरएमओ डॉ. प्रियांका पारखे, डॉ. पद्मिनी पथाडे, डॉ. विजय लालबिघे व स्टाफ माधुरी खरात, शबाना इनामदार, प्राजक्ता सपकाळ, शुभम सोनटक्के, करण जाधव, ज्योती मोरे, संदीप मदने व संदिप ढावरे यांनी केलेले प्रयत्न, योग्य उपचार पध्दतीचा केलेला अवलंब तसेच आजोबांची प्रबळ इच्छा शक्ती आदींमुळे कोरोना विरोधातील लढाई यशस्वीपणे जिंकता आली आहे. आजोबांच्या कुटूंबाने डॉक्टर आणि काम करणार्‍या सर्व टीमला स्वीटस देत तसेच सत्कार करत त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.

प्राथमिक तपासणी केल्यानंतर असे जाणवले की, ऑक्सिजन प्रमाण हे 90 ते 92 टक्के राहत आहे. त्यांना बाहेरून साधारण दोन लिटर ऑक्सिजनची त्यांची गरज तिथं जाणवत होती. त्यांच्या छातीचा सिटी स्कॅन करण्यात आला. त्यांचा स्कोर 9 बाय 25 असा आला. हा साधारण दुसर्‍या पायरीचा कोरोनाचा न्यूमोनिया झाल्याचे निदान झालेले होते. त्यांना योग्य ते औषध उपचार चालू करण्यात आले. त्यांच्या जेवणामध्ये वाढ झाली. ऑक्सिजनचे जे प्रमाण बाहेरून सपोर्टिंग लागत होतं ते कमी झालं. यावेळी आयुर्वेदिक काढे ही देण्यात आले. सर्व स्टाफ डॉक्टर यांचे प्रयत्न असतील तसेच एक नातू म्हणून ज्या जबाबदार्‍या पार पाडायच्या आहेत त्या सर्व जबाबदार्‍या डॉ. उत्कर्ष धायगुडे यांनी पार पाडल्या. सर्वांनी केलेले प्रयत्न आणि आमच्या वर दाखविलेला विश्‍वास यामुळे आमचे मनोबल वाढले.

डॉ. मकरंद डोंबाळे (स्वामी समर्थ हॉस्पिटल)

दि. 18 रोजी माझे आजोबा दादासाहेब धायगुडे यांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने डॉ. मकरंद डोंबाळे आणि डॉ. उमेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ येथे दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक होती व ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. परंतू डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे तसेच स्वामी सामर्थ्य हॉस्पिटलमधील सर्व स्टाफच्या सेवेतून आजोबा कोरोनातून मुक्त झाले आहेत. ते चांगल्या स्थितीत घरी जात असल्याने त्याबद्दल स्वामी समर्थ हॉस्पिटल परिवार व मित्र परिवाराचे आभारी आहे.

डॉ. उत्कर्ष धायगुडे (आजोबांचे नातू)

COMMENTS