नेहमीच या ना त्या कारणाने चर्चित असलेला अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा श्री यशवंतराव चव्हाण मेमोरिअल मेडिकल अँड रूरल
नेहमीच या ना त्या कारणाने चर्चित असलेला अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा श्री यशवंतराव चव्हाण मेमोरिअल मेडिकल अँड रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल संस्थेत नोकरीस असलेल्या एकाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आत्महत्या केली आहे. प्रतीक बाळासाहेब काळे वय 27 असे या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास नगर – औरंगाबाद रोडवरील हॉटेल सुवर्णज्योतजवळ शेतामध्ये लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. प्रतिकची बहीण प्रतीक्षा काळे हिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून सात जनांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये व्यंकटेश नामदेव बेल्हेकर, विनायक दामोदर देशमुख, राहुल जनार्दन राजळे, महेश गोरक्षनाथ कदम, जगन्नाथ कल्याणराव औटी, रावसाहेब भीमराज शेळके, रितेश बबन टेमक यांचा समावेश आहे. तक्रारीत म्हटले आहे की, भाऊ प्रतिकला सातजन गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक त्रास देत होते. प्रतिकच्या प्रामाणिकपणामुळे तो गडाख कुटुंबाच्या जवळ गेला होता. यामुळे या सात जणांनी प्रतिकला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याला तू नोकरी सोड, महाराष्ट्रात राहू नको असे सांगण्यात आले होते. त्याची खानावळ बंद पाडण्यात आली, ऍडव्हान्स कमी करण्यात आला. बळजबरीने राजीनामा घेण्यात आला. पण तो मंजूर केला नाही. हा सर्व अन्याय आणि त्रास प्रतीक घरी नेहमी सांगत होता. अखेर त्रास असह्य झाल्याने त्याने आत्महत्या केली असून यास जबाबदार असणाऱ्या सातही जणांना अटक करून प्रतिकला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बहीण प्रतीक्षा काळे यांनी केली आहे. काळ रात्री प्रतीक याचा मृतदेह पोलीस व नातेवाईकांना आढळून आला. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, याबाबत सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली असून, त्यामध्ये काही राजकीय नेत्यांचीही नावे घेण्यात आली आहेत.
COMMENTS