अहमदनगर : श्री विशाल गणेशाच्या चरणी सोन्याचा मोदक अर्पण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर : श्री विशाल गणेशाच्या चरणी सोन्याचा मोदक अर्पण

नगर -  श्री विशाल गणेश मंदिर हे पावन तिर्थक्षेत्र असून, जिल्ह्याबरोबरच राज्यातही अनेक भक्त परिवार आहे. हे भाविक नियमित श्री विशाल गणेशाच्या दर

नगर लसीकरण केंद्रात पुन्हा वाढदिवसाचा धूम धडाका l पहा LokNews24
महात्मा फुले कृषि विद्यापीठात सॉफ्टवेअरचे दोन आठवड्याचे प्रशिक्षण संपन्न
कोतुळमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात

नगर – 

श्री विशाल गणेश मंदिर हे पावन तिर्थक्षेत्र असून, जिल्ह्याबरोबरच राज्यातही अनेक भक्त परिवार आहे. हे भाविक नियमित श्री विशाल गणेशाच्या दर्शनासाठी येथे असतात. भाविकांची मोठी श्रद्धा या श्री विशाल गणेशावर असल्याने मंदिराच्या कार्यात ते योगदान देत असतात. या योगदानातून मंदिराचा भव्य, सुरेख असा जिर्णोद्धार  झाला आहे. दिनकरराव ठुबे यांची श्री विशाल गणेशावर मोठी श्रद्धा असल्याने त्यांनी सोन्याचा मोदकरुपी देणगी देऊन आपली भक्ती अर्पण केली आहे. अशा दानशुरांच्या सहकार्यात मंदिराचा लौकिक वाढतच राहील, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले.

    शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास कान्हूर पठार येथील गणेशभक्त दिनकर बाबाजी ठुबे यांनी सोन्याचा मोदक श्री विशाल गणेश चरणी अर्पण केला. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, पुजारी संगमनाथ महाराज, सीए सुनिल कुलट, अ‍ॅड.पाटील, आचार्य सर आदि उपस्थित होते.

    याप्रसंगी दिनकर ठुबे म्हणाले, श्री विशाल गणेशावर आपली मोठी श्रद्धा असून, नित्यनियमाने आपण दर्शनासाठी येत असतो. श्री विशाल गणेशाच्या आशिर्वाद सदैव आपल्या पाठिशी असल्याने मंदिराच्या कार्यात आपलाही सहभाग असावा, या भावनेतून आपण श्री चरणी सोन्याचा मोदक अर्पण केला आहे.

    यावेळी पंडितराव खरपुडे यांनी देवस्थानच्यावतीने सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी देणगीदार ठुबे परिवाराचा यावेळी देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला.

COMMENTS