अहमदनगर बारच्या अध्यक्षपदासाठी; तिरंगी तर उपाध्यक्षपदासाठी दुरंगी लढत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर बारच्या अध्यक्षपदासाठी; तिरंगी तर उपाध्यक्षपदासाठी दुरंगी लढत

अहमदनगर/प्रतिनिधी-अहमदनगर बार असोसिएशनच्या एकूण 8 पदासाठी शुक्रवारी (दि. 29) होत असलेल्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी शुक

सहज ध्यानाने कौटुंबिक स्वास्थ लाभते – सौ. सविता सोनवणे
मटण दिले नाही म्हणून दोन गटात तुफान धुमश्‍चक्री ; हाणामारीत आठ जखमी
भाळवणीजवळील अपघातात सहा जणांचा मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी-अहमदनगर बार असोसिएशनच्या एकूण 8 पदासाठी शुक्रवारी (दि. 29) होत असलेल्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी शुक्रवारी (दि.22) झाली. या छाननीनंतर अध्यक्षपदासाठी तिरंगी तर उपाध्यक्षपदासाठी दुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले.
असोसिएशनच्या निवडणुकीतील पदनिहाय उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. अशोक यशवंतराव गुंड पाटील यांनी प्रसिद्ध केली आहेत. हे उमेदवार याप्रमाणे- अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. संजय उर्फ संजू गोवर्धन पाटील, अ‍ॅड. सुधीर विष्णुपंत टोकेकर व अ‍ॅड. अनिल दिनकर सरोदे. उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. अनुराधा दिनेश येवले व अ‍ॅड.संदीप रामदास वांडेकर. सचिवपदासाठी अ‍ॅड. अनुराधा दिनेश येवले व अ‍ॅड. स्वाती शाम नगरकर. खजिनदारपदासाठी अ‍ॅड.अविनाश विलासराव बुधवंत, सहसचिवपदासाठी अ‍ॅड.अमित प्रमोद सुरपुरिया, महिला सहसचिव पदासाठी अ‍ॅड. स्वाती शाम नगरकर, अ‍ॅड.आरती नवनाथ गर्जे पाटील, कार्यकारणी सदस्यपदासाठी अ‍ॅड.सागर कृष्णा जाधव, अ‍ॅड. विक्रम भाऊसाहेब शिंदे, महिला कार्यकारणी सदस्यपदासाठी अ‍ॅड.सोनाली बाबा कचरे. अहमदनगर बार असोसिएशनची निवडणूक शुक्रवार दिनांक 29 ऑक्टोबरला नवीन न्यायालय महिला वकील कक्षेमध्ये सकाळी 8.30 ते दुपारी 4.30 या वेळेत मतदान होणार आहे. याच दिवशी सायंकाळी पाच वाजेनंतर मतमोजणी होऊन लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे.

COMMENTS