अहमदनगर जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरु करण्याची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरु करण्याची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शासनानेही बहुतांश व्यावसायिक व सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध शिथि

ज्ञानेश्‍वर देशमुख यांच्याकडून नवे देडगाव शाळेला पुस्तके भेट
शिर्डीत साई परिक्रमा भक्तिमय वातावरणात उत्साहात
माणिकपणे आणि माणुसकीने काम केल्याचे समाधान मोठे ः शंकरराव परदेशी

अहमदनगर/प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शासनानेही बहुतांश व्यावसायिक व सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु अजूनही आठवडे बाजार बंद आहेत. आठवडे बाजारावर अवलंबून असणार्‍यांच्या उपजीविकेचा निर्माण झाला असल्याने तातडीने हे आठवडे बाजार सुरु करावेत, अशा मागणीचे निवेदन श्रीसंत सावता माळी युवक संघ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, मनसेचे सचिव नितीन भुतारे, अनिल इवळे, समीर शेख, रोहित वाळके, दत्तात्रय साळूंके, माऊली गायकवाड आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे सर्वच व्यवसायिकांबरोबरच सर्वसामान्यांवर मोठे संकट निर्माण झाले होते. आता निर्बंध शिथिल होत असतानाही जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद असल्याने यावर अवलंबून असणार्‍यांना उपजीविका चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकांनी व्यवसायाकरिता बँकेची कर्जे घेतली आहेत, ती कशी फेडायचे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यात अनेकांनी आत्महत्याही केल्या आहेत. तेव्हा आताच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरु करावेत. नियमांचे पालन करुन हे व्यवसाय करण्यास व्यावसायिक तयार आहेत, तेव्हा आठवडे बाजार सुरु करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी दीपक साखरे, सुनील शिंदे, सुरेश आरोटे, श्याम औटी, प्रदीप आंभोरे, अमिर शेख, आरिफ आत्तार, वसिम सत्तार, संतोष जाधव उपस्थित होते.

COMMENTS