अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून कारवाई करा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून कारवाई करा

पारनेर प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील जवळे येथे बुधवारी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. ही घटना अतिशय निंदनीय व माणुसकीला

प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
भंडारदरा परिसर काजवा महोत्सवासाठी सज्ज
सावधान…कोरोना पुन्हा हात-पाय पसरतोय…;

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील जवळे येथे बुधवारी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. ही घटना अतिशय निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणारी असल्याने तातडीने आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे या मागणीचे निवेदन पारनेर तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पारनेर पोलिसांना देण्यात आले.

जवळे येथील बरशिले वस्तीवर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बुधवारी दुपारी अज्ञातांनी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. घटनेच्या ठिकाणी हत्येच्या वेळी वापरलेले अनेक पुरावे पोलिसांना मिळून आले आहेत. संशयितांची चौकशी सुरू आहे. तरी सदरच्या गुन्ह्याच्या वरिष्ठ पातळीवरून तपास करण्यात यावा. सदरची केस ही जलदगती न्यायालयात चालवण्यात यावी. 

आरोपींकडून पीडितेच्या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रकार घडू शकतो यासाठी पीडितेच्या कुटुंबियांना पोलीस सरंक्षण द्यावे व कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देणेकामी पुढील कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी पारनेर तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने  तालुका महिला आघाडी प्रमुख प्रियांका खिलारी, महिला आघाडी शहर प्रमुख ललिता औटी, गणप्रमुख वर्षा खामकर यांच्यावतीने पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी डॉ पद्मजा पठारे, प्राजक्ता गाडगे, अलका खामकर, प्रीती परांडे, रोहिणी औटी, विद्या खामकर, ताराबाई वारे, पूनम खोडदे, संगीता भोसले, प्रमिला पावरा, वंदना पावरा,हेमा खोडदे आदी महिला उपस्थित होत्या.

COMMENTS