अर्बन बँक निवडणूक तुर्त थांबवण्याची सरकारला विनंती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्बन बँक निवडणूक तुर्त थांबवण्याची सरकारला विनंती

नगर -  नगर अर्बन को ओप बँक  निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे परंतु निवडणुकीसाठी ही वेल योग्य नाहीय. प्रशासकासच काही काळ मुदतवाढ द्य

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार? अजित पवार म्हणाले…

नगर – 

नगर अर्बन को ओप बँक  निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे परंतु निवडणुकीसाठी ही वेल योग्य नाहीय. प्रशासकासच काही काळ मुदतवाढ द्यावी. बँकेची परिस्थिती आणि सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर  थोडी परिस्थिती सुधारल्यावरच निवडणूक घ्यावी,  अशी मागणी नवनीत विचार मंचचे प्रमुख सुधीर मेहता यानी केंद्रीय सहकार खात्याला केली.

     केंद्रीय सहकार मंत्री ना.अमित शाह यांना त्यांनी तातडीने निवेदन पाठवले असून बँकेवर प्रशासक नेमल्यानंतरही बँकेची परिस्थिती आहे तशीच आहे. बँकेच्या ठेवी कमी आणि एनपीए प्रचंड प्रमाणात वाढला आहे. सभासद ठेवीदारात अतिशय संभ्रमाचे वातावरण असून, बाजार पेठेत अतिशय प्रतिकुल वातावरण असल्याने त्याचा मोठा परिणाम बँकेच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे. कोरोना काळात व्यवसाय पूर्णत: ठप्प झाल्याने त्याचाही मोठा परिणाम वसुलीवर झाला होता. आता व्यवहार सुरळीत होऊ लागले असल्याने प्रशासकासच काही काळ काम करु द्यावे. वसूली, ठेवी आणि एनपीएची परीस्थिती सुधारल्यानंतर निवडणूक कार्यक्रम घेणे योग्य होइल, असे मेहता यानी सहकार खात्याला पाठवलेल्या निवेदनात  म्हटले आहे.

         अतिशय घाईत आणि चुकीच्या वेळेत होणार्‍या निवडणुकामुळे आगीतून  फुफाट्यात म्हणतात .. अधिक खेळखंडोबा अशी अवस्था होणार असल्याचे सुधीर मेहता यानी म्हंटले आहे. खासदार सुजय विखे यांनी सहकार खात्यात यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती सुधीर मेहता यांनी केली आहे. अजुन फक्त मतदार यादीचा कार्यक्रम सुरु झाला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम थांबवता येऊ शकतो, याकडे सुधीर मेहता यानी त्यांचे लक्ष वेधले आहे.

COMMENTS