अमेरिकेकडून काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा

Homeताज्या बातम्यादेश

अमेरिकेकडून काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा

काबूल/वृत्तसंस्था : काबूल विमानतळावर इसिस या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात अनेक नागरिकांसह अमेरिकेचे 13 सैनिक ठार झाले होते. यानंतर अमेरिकेचे र

सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच
दिल्ली मेट्रोत महिलांचा पुन्हा राडा
विकास थांबवणारा तुमचा लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही ः डॉ. सुजय विखे

काबूल/वृत्तसंस्था : काबूल विमानतळावर इसिस या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात अनेक नागरिकांसह अमेरिकेचे 13 सैनिक ठार झाले होते. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काबूलमधील हल्लेखोरांना धडा शिकवू असा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी 48 तासांमध्ये एअर स्ट्राईक करत हल्लेखोरांचा खात्मा केला. यासंदर्भातील माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटागॉनने दिली आहे. काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात 95 अफगाणी नागरिक व 13 अमेरिकी सैनिक ठार झाले आहेत. या हल्लयामध्ये प्राण गमावणार्‍यांमध्ये 13 अमेरिकन सैनिक असल्याने अमेरिका या हल्ल्यानंतर चांगलाच खवळला होता. इस्लामिक स्टेटच्या खुरासान मॉडेलने म्हणजेच आयएसआयएस के या संघटनेने बॉम्ब हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. अमेरिकने पुन्हा एकदा काबूल विमानतळावर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली असून लवकरात लवकर येऊन आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
एकीकडे दहशतवादी हल्ले सुरू असतांना, अनेक देश बचाव मोहीम थांबवतांना दिसून येत आहे. स्पेननंतर आता जर्मनी, स्वीडननं देखील अफगाणमधील आपली बचाव मोहीम थांबवली असून अमेरिका, ब्रिटनसह इतर देश मात्र 31 ऑगस्टपर्यंत ही बचाव मोहीम सुरु ठेवणार आहेत. अफगाणिस्तानला ताब्यात घेतलेल्या तालिबान्यांनी बचाव मोहिमेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची देशांना मुदत दिली. तर दुसरीकडे 31 ऑगस्टपर्यंत हल्लेखोरांकडून नागरिक आणि सैन्याला पुन्हा लक्ष्य केले जाऊ शकते, असेही बोलले जात आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर स्पेनसह जर्मनी आणि स्वीडने देखील आपली बचाव मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला. स्पेन सरकारने सांगितले की, अफगाणिस्तानातून दुबईत दोन लष्करी विमाने आल्यामुळे आमचे स्थलांतर ऑपरेशन थांबवत आहोत. आताही काबूल विमानतळावर संशयास्पद हालचाली होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं आम्ही ही मोहीम तुर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला.

…पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता
काबूल विमानतळांवर शुक्रवारी सकाळी मोठया प्रमाणावर हल्ले झाल्यानंतर अमेरिकन ब्रॉडकास्ट कंपनीच्या मते, विमानतळाच्या उत्तर गेटवर कार बॉम्बस्फोटाचा धोका निर्माण झाला असून अशा परिस्थितीत काबूलमधील अमेरिकन दूतावासाने नवीन अलर्टही जारी केला आहे. काबूल विमानतळावर तीन आत्मघाती बॉम्बस्फोटांनंतर, ब्रिटनने स्पष्ट केले की ते अफगाणिस्तानातील बचाव मोहीम काही तासांत संपवतील. ब्रिटीश संरक्षण सचिव बेन वालेस म्हणाले, आम्ही आमच्या लोकांना बाहेर काढत आहोत. सुमारे 1,000 लोक आता विमानात सुखरुप आहेत. शिवाय, आम्ही गर्दीतून काही लोक शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.

काबूलमधील बचाव मोहीम गुंडाळली
तालिबान्यांनी दहशतवादाच्या जोरावर अफगाणिस्तानला ताब्यात घेतल्यानंतर दहशतवादी कारवायांनी पुन्हा वेग घेतला होता. त्या पार्श्‍वभूमीवर विविध देशांनी आपल्या नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी बचाव मोहीम सुरू केली होती. मात्र स्पेनसह जर्मनी आणि स्वीडने रेस्न्यु ऑपरेशन थांबवत ही बचाव मोहीम गुंडाळली आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेसह इतर देश 31 ऑगस्टनंतर ही बचाव मोहीम थांबवणार आहेत. त्यामुळे जवळपास बचाव मोहीम सर्वच देशांनी गुंडाळल्याचे चित्र आहे. जर्मनीने एकूण 45 देशांच्या 5,347 लोकांना बाहेर काढले.

COMMENTS