अमिताभ बच्चन यांना कायमची दारू सोडायला लावणाऱ्या जिवलग मित्राची खास कहाणी

Homeताज्या बातम्यादेश

अमिताभ बच्चन यांना कायमची दारू सोडायला लावणाऱ्या जिवलग मित्राची खास कहाणी

अमिताभ बच्चन यांनी  वैयक्तिक आयुष्यातल्या पेचप्रसंगांना तोंड देत त्यांनी ही उंची गाठली. यापैकीच एक महत्त्वाची घटना आज आपण पाहणार आहोत. साधारणतः

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल.
अमिताभ बच्चन यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात पार पडली अँजिओप्लास्टी
टायगर-क्रिती सेननच्या ‘गणपत’ मध्ये अमिताभ बच्चनची दमदार एन्ट्री.

अमिताभ बच्चन यांनी  वैयक्तिक आयुष्यातल्या पेचप्रसंगांना तोंड देत त्यांनी ही उंची गाठली. यापैकीच एक महत्त्वाची घटना आज आपण पाहणार आहोत. साधारणतः जगभरातील लोक गोव्यात (Goa) जातात आणि दारूमध्ये बुडतात, पण अमिताभ बच्चन यांनी गोव्यामध्येच आयुष्यभर दारू सोडण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूडमधील (Bollywood) त्यांचा सर्वांत जुना मित्र अन्वर अलीच्या सांगण्यावरून त्यांनी दारू सोडली आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं.  अन्वर यांनी सांगितलं की, “आम्ही एकदा गोव्यातील मांडोवी हॉटेलमध्ये होतो. मी गोल्ड स्पॉट पीत होतो. मी अमितला उत्साहाने व्हिस्की, रम पिताना पाहिले. ते हेवी ड्रिंक घेत होते. त्यावेळी मी त्यांना काहीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही शॉवर घेत होतो. मग मी म्हणालो- “अमित ही तुझी सुरुवात आहे. कलाकारासाठी दारू घातक आहे. तुम्हाला अनेक वेळा दारूच्या ऑफर टप्प्याटप्प्यावर मिळतील, पण त्यापासून दूर राहून तुम्ही तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायला हवं.” असा हा बहुमोल संदेश अन्वर यांनी अमितला त्या त्या वेळी दिला  

यावर अमिताभ म्हणाले, “अन्नू तू बोललेली गोष्ट मनाला लागली. आजपासून माझ्यासाठी दारू हराम आहे. अमितने व्हिस्कीची बाटली घेतली आणि फोडली. म्हणाला, “ले बिडू तुझ्या मैत्रीसाठी ही दारू सोडून दिली.” मला आनंद आहे की अमितने पुन्हा दारूला स्पर्श केला नाही. बाबूजी आणि मां यांची मूल्ये, विचार आणि आदर्श तसेच त्यांच्या समर्पणाने अमिताभ यांना शतकातील नायक बनवले.”

बच्चन यांच्यासोबत अन्वर यांची भेट १९६९ ला सांताक्रूझ विमानतळावर झाली होती. जलाल आगा त्यावेळी त्यांच्यासोबत होते. पांढरा कुर्ता-पायजमा आणि कोट घातलेला एक उंच तरुण आमच्याकडे आला आणि त्याने स्वतःची ओळख करून दिली, ‘हॅलो, मी अमिताभ आहे.’ मेहमूद भाईंनी अन्वर यांना जग्वार कार दिली होती. त्याच कारमध्ये दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांच्या कार्यालयात गेलो. अमिताभ आणि ते, दोघेही त्यांच्या सात हिंदुस्तानी चित्रपटात होते. सात हिंदुस्तानीच्या शूटिंग दरम्यान अमित आणि माझी मैत्री फुलली. दोघेही आपलं करिअर सुरू करत होते. अशा प्रकारे दोघेही एकमेकांसाठीचे प्रेरक घटक बनले.

जेव्हा अन्वर निराश व्हायचे तेव्हा अमित त्यांना प्रोत्साहन द्यायचे आणि जेव्हा अमित यांना करिअरमध्ये हरल्यासाखं वाटायचं, पराभूत झाल्याची भावना यायची. तेव्हा अन्वर अमिताभ यांना नेहमी सोबत असल्याचं सांगायचे. अश्या पद्धतीने दोघे एकमेकांना साथ देत असायचे .  अन्वर करिअरच्या सुरुवातीचे काही किस्से  आवर्जून सांगतात  म्हणतात  “आम्ही सकाळी ४ वाजता हाजी अली दर्गा आणि बाबुल नाथ मंदिरालाही भेट द्यायचो. मग निर्माता-दिग्दर्शकांच्या कार्यालयात फेऱ्या मारायचो. काही काळानंतर अमित माझ्याबरोबर अंधेरीतील पॅराडाईज बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर शिफ्ट झाला. तिथं महमूद यांचे संपूर्ण कुटुंब तीन मजली इमारतीत राहात होते. मग मी अमितसोबत दिवस -रात्र काढायचो. जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा आम्ही कारने मरिन ड्राइव्हला फिरायला जायचो. जास्त पैसे नव्हते. अनेक वेळा असे झाले की कारचे पेट्रोल संपले आणि नंतर आम्ही बसने किंवा लोकलने घरी परतलो.”

COMMENTS