अत्याचार करणार्‍या आरोपीस पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अत्याचार करणार्‍या आरोपीस पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

अहमदनगर/प्रतिनिधी : एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला श्रीगोंदा न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सचिन शालन पवार (रा.

स्वाधार योजना तालुका स्तरावर लागू करावी ः प्रा. बाबा खरात
पंढरपूर पोटनिवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार : राजू शेट्टी
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचाही स्पर्धा परीक्षेत डंका : कुमावत

अहमदनगर/प्रतिनिधी : एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला श्रीगोंदा न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सचिन शालन पवार (रा.जामखेड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी सचिन पवार याने सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रुममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. या अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी पिडीत मुलीला दिली होती. याप्रकरणी सचिन पवारविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात भा.द.वि.कलम 376 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाने मांडलेली बाजू व साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्याने न्यायालयाने सचिन पवार यास दोषी मानून पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. अनिल घोडके यांनी काम पाहिले.

COMMENTS