अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करा- भाई मोहन गुंड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करा- भाई मोहन गुंड

बीड प्रतिनिधी  आठ दिवसा पासून सातत्‍याने बीड जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे हाता तोंडाशी आलेली पिके पूर्ण पाण्यात गेले आहेत, मध्यंतरी पाऊस नसल्यामु

स्वयंपूर्ण गावासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा- कृषिमंत्री दादाजी भुसे
थकबाकीमुक्त शेतकर्‍याला ध्वजारोहणाचा मान; महावितरण लोणंद उपविभागाचे पाऊल
कडकनाथ कोंबडी फसवणुकीच्या नैराशेतून युवकाची आत्महत्या

बीड प्रतिनिधी 

आठ दिवसा पासून सातत्‍याने बीड जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे हाता तोंडाशी आलेली पिके पूर्ण पाण्यात गेले आहेत, मध्यंतरी पाऊस नसल्यामुळे तर पीक गेली होते त्यातुन वाचलेली थोडेफार  आलेल्या पिकांचे आज जास्त पावसाने खूप नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांच्या गुरा ढोरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकर्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी जिल्हा आधिकार्याकडे शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी केली आहे 

बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंधारे पाझर  तलाव फुटुन जमीन उध्वस्त झाल्या आहेत, मागील वर्षी पिक विमा शेतकऱ्यांना मिळाला नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी पीक विमा भरला नाही, त्यामुळे सरसकट  शेतकऱ्यांच्या पिक पंचनामे करून सरसकट तात्काळ 50 हजार  रुपयांची मदत आठ दिवसांत करण्यात यावी आशी मागणी मा मुख्यमंत्री,कृषी मंत्री  विभागीय आयुक्त, पालक मंत्री यांच्याकडे केली आहे, तात्काळ मदत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई मोहन गुंड अॅड संग्राम तुपे दत्ता प्रभाळे अर्जुन सोनवणे भिमराव कुटे,यांनी दिला आहे,

COMMENTS