अतिवृष्टीनंतर पाथर्डीकराचे पाण्यावाचून दैना;सोमवार मंगळवारपर्यत प्रतीक्षा करावी लागेल;- नगराध्यक्ष गर्जे यांची माहिती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिवृष्टीनंतर पाथर्डीकराचे पाण्यावाचून दैना;सोमवार मंगळवारपर्यत प्रतीक्षा करावी लागेल;- नगराध्यक्ष गर्जे यांची माहिती

अभिजित खंडागळे/पाथर्डी : चार दिवसांपूर्वी पाथर्डी शेवगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विजेचे पोल पडल्याने पाथर्डीकराना पाणी समस्येला सामोरे जावे

सोमनाथ जंगम यांचा डॉक्टर ऑफ सोशल वर्क किताबाने सन्मान
राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत धमाल मेळावा उत्साहात
मुळा धरणातील गाळ काढण्यासाठी येणार वेग

अभिजित खंडागळे/पाथर्डी : चार दिवसांपूर्वी पाथर्डी शेवगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विजेचे पोल पडल्याने पाथर्डीकराना पाणी समस्येला सामोरे जावे लागत असून काही भागात गेल्या सात दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिकांचे पाण्यासाठी वणवण होत आहे.

विजेचे पोल तुटल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.पोल बसवण्यात आले असून जॅकवेल ज्या ठिकाणी आहे तिथून ढोरा नदीचा प्रवाह जात असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी आहे.त्यामुळे त्या पाण्यातून रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत असून सोमवार मंगळवार पर्यत थांबावे लागेल.शेवगावमध्ये पाणी सोडण्याचा प्रयत्न केला असता तेथिल वॉटर फिल्टर टँक ब्लॉक झाला होता.पाण्याच्या समस्येसंबंधी नगराध्यक्ष मृत्यूजय गर्जे यांना संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली आहे.

COMMENTS