अतिक्रमणांवर पडतोय हातोडा… रस्त्यांचा श्‍वास होतोय मोकळा..

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिक्रमणांवर पडतोय हातोडा… रस्त्यांचा श्‍वास होतोय मोकळा..

अहमदनगर/प्रतिनिधी-एकीकडे रस्त्यांतील खड्डे व दुसरीकडे अतिक्रमणे यामुळे वैतागून गेलेल्या नगरकरांना महापालिकेने दिलासा देण्याचे ठरवले आहे. मंगळवारी अचा

सादिकच्या मृत्यूचे गूढ वाढले…वरिष्ठांना पाठवला अहवाल ; मुकुंदनगर परिसरात बंदोबस्त वाढवला, चौकशी अहवालाची प्रतीक्षा
ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांची वेळेत निर्मिती आणि साठवणूक करण्यास प्राधान्य : मुश्रीफ
Ahmednagar : नगर – कल्याण महामार्गाचे काम सुरु…खा.विखे – आ .जगताप यांनी केली पाहणी | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी-एकीकडे रस्त्यांतील खड्डे व दुसरीकडे अतिक्रमणे यामुळे वैतागून गेलेल्या नगरकरांना महापालिकेने दिलासा देण्याचे ठरवले आहे. मंगळवारी अचानकपणे वाडियापार्कजवळील व आशा चित्रपटगृहाजवळील फळ विक्रेते व टपर्‍यांची अतिक्रमणे हटवून या गर्दीच्या रस्त्यांचा श्‍वास मोकळा केला. अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख अभियंता कल्याण बल्लाळ व प्रभाग अधिकारी दिनेश सिनारे यांच्या नेतृत्वाखाली वाडियापार्क येथून या कारवाईला सुरुवात करण्यात आली. ही मोहीम आता रोज शहराच्या विविध रस्त्यांवर राबवली जाणार आहे.
मध्य नगर शहरातील बहुतांश रस्ते अरुंद आहेत. तशात या रस्त्यांवरील दवाखाने व खासगी आस्थापनांना स्वतंत्र पार्किंग सुविधा नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांकडे येणार्‍या ग्राहकांची वाहने रस्त्यांवरच लावली जातात. तसेच फळे विक्रेते, भाजी विक्रेते, स्टेशनरी विक्रेतेही रस्त्यांच्या कडेलाच ठाण मांडून असतात. यातून रस्ता काढताना रस्त्यांतील खड्ड्यांचाही त्रास नागरिकांना होतो. ते चुकवत व रस्त्यांवरील विक्रेतांना वाचवत दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने रस्ता काढतात. पण यात वाहतूक कोंडीचे प्रकार ठिकठिकाणी होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे.

वाडियापार्कपासून सुरुवात
वाडियापार्कजवळील रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने असलेल्या फळ विक्रेत्यांना मनपाच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मागे जागा करून दिली आहे. त्या जागेच्या पुढे येणारांची फळे जप्त करण्याची तंबीही त्यांना देण्यात आली आहे. या रस्त्यावर असलेल्या वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने व्यवसाय करण्याची समजही या विक्रेत्यांना दिली गेली आहे. त्यानंतर या पथकाने आशा टॉकीज चौकातील बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या परिसरातील टपर्‍या हटवल्या. या चौकातील वाहतुकीलाही या टपर्‍यांचा व छोट्या विक्रेत्यांचा अडथळा होता. त्यामुळे या टपर्‍या हटवून तेथील रस्ताही मोकळा करण्यात आला आहे.

दोन पथके कार्यरत
महापालिका प्रशासनाने शहरात अतिक्रमणांवर कारवाईला सुरुवात केल्यानंतर दोन पथके यासाठी तैनात करण्यात आली आहे. एका पथकाने वाडियापार्क परिसरात रस्त्यावर आलेले फळविक्रेते, हातगाडी व्यावसायिकांना हटवले व त्यानंतर माळीवाडा वेस परिसरात कारवाई केली ती झाल्यावर पथकाकडून आशा टॉकीज चौक परिसरातही कारवाई झाली. यादरम्यान, दुसर्‍या पथकाकडून औरंगाबाद महामार्गाजवळील जुन्या आरटीओ कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीच्या परिसरात बांधण्यात आलेले दोन पत्र्याचे गाळे व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली आहे. या गाळ्यांबाबतची कागदपत्रे सादर करण्यास दोन दिवसांची मुदत संबंधितांना देण्यात आली आहे. कागदपत्रे कायदेशीर नसतील तर येथील सर्व गाळे जमीनदोस्त करण्यात येणार असल्याने अभियंता बल्लाळ यांनी सांगितले.

COMMENTS