अज्ञात ड्रोन खाली उतरले…पारनेरकर झाले हवालदिल…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अज्ञात ड्रोन खाली उतरले…पारनेरकर झाले हवालदिल…

अहमदनगर/प्रतिनिधी-पारनेर तालुक्यात अज्ञात ड्रोन उतरल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कधी काय घटना घडतील हे सांगता येत नाही. गुन्हेगारीबाबत त

SANGMANER : संगमनेर शहर पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय अंधारात l Lok News24
संगमनेरचे सहकार मॉडेल देशाला दिशादर्शक – आ.डॉ.तांबे
अवघी दोन दिवसाची सवलत…मनपाने केले पुन्हा सर्व बंद ; किराणा-भाजी मिळण्यास येणार अडचणी, पोलिसांनी घेतला होता आक्षेप

अहमदनगर/प्रतिनिधी-पारनेर तालुक्यात अज्ञात ड्रोन उतरल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कधी काय घटना घडतील हे सांगता येत नाही. गुन्हेगारीबाबत तर अलीकडील काही काळात अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत पारनेरला घडलेल्या एका घटनेने बराच काळ गोंधळ उडाला व नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
पारनेर तालुक्यातील सुतारवाडी व भोकरदरा (ढवळपुरी) परिसरात ही घटना घडली. अज्ञात ड्रोन येथे खाली उतरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. ही माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांच्यापर्यंत पोहोचवली गेली. त्यानंतर त्यांनी नागरिकांना या ड्रोनपासून दूर राहण्यास सांगितले. रात्री लष्कराचे अधिकारी यांनी ढवळपुरी पसिरात येऊन हे ड्रोन ताब्यात घेतले.
याबाबत माहिती अशी की, दि. 7 रोजी सायंकाळच्या सुमारास सुतारवाडी परिसरात एक अज्ञात ड्रोन उतरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे ड्रोन नेमके कोणाचे असावे? यात काही धोकादायक तर काही नसेल ना? ड्रोन व त्यातील कॅमेर्‍याद्वारे काही तपासले तर जात नाही ना, काही माहिती वा फोटो घेतले जातात काय, अशा प्रकारच्या अनेकविध शंका व अफवा परिसरात पसरल्या. त्यामुळे या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत तहसीलदार देवरे यांनी लष्करी अधिकार्‍यांना कळविल्यानंतर लष्कराचे अधिकारी मेजर भगिंदरसिंग हे त्या ठिकाणी आले. त्यानंतर हे ड्रोन लष्कराचेच असावे, असा अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला.

उलगड़ा झाला, जीव भांड्यात पडला…
बर्‍याच वेळानंतर या गोष्टीचा उलगडा झाला. तो असा की, ढवळपुरीचा बराचसा भाग लष्कराच्या के. के. रेंज हद्दीत आहे. 15 ऑगस्ट पूर्वी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डेमो फायरिंग होणार आहे .तेव्हा या के.के.रेंज क्षेत्राचा सर्व्हे केला जात आहे. मागील सात-आठ दिवसापासून लष्कराचे 21 ड्रोन दररोज या परिसरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत टेहळणी करीत असतात. या ड्रोनला नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथील केंद्रातून संचलित व नियंत्रित केले जाते. 21 ड्रोन पैकी 1 ड्रोन परत लष्करी केंद्रात आले. मात्र, यातील एक ड्रोन ढवळपुरी-सुतारवाडी जुना रोडवरील खिंडी जवळील शिवा मिसाळ यांच्या घराच्या परिसरात उतरले. दुसरे ढवळपुरीतीलच भोकरदरा येथे कोसळले तर तिसरा ड्रोन विळद येथे सापडला.
या ड्रोनला कॅमेरे, जीपीएस प्रणाली असल्याने त्यांचे ठिकाण लष्कराला मिळले. त्यानंतर लष्कराच्या अधिकार्‍यांनी रात्री ढवळपुरीतील काही युवकांना सोबत घेऊन सुतारवाडी परिसरातील ड्रोन ताब्यात घेतले. या ड्रोन नाट्याचा अखेर उलगडा झाल्यावर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

COMMENTS