अजित पवार पुण्यातून गायबचः चंद्रकांतदादा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवार पुण्यातून गायबचः चंद्रकांतदादा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे गायबच होते, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

इंडियाविरुद्ध एनडीएचा सामना रंगणार
800 कर्जदार शेतक-यांची माहितीच जुळेना
डॉ. भास्कर मोरेला एक दिवसाची पोलिस कोठडी

पुणे / प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे गायबच होते, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. पवार यांनी पुण्यात शिफ्ट व्हावे आणि इथून कारभार चालवावा किंवा पालकमंत्रिपद दुसर्‍या कोणाला तरी द्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली.

पवार हे गायब असल्याचा दावा पाटील यांनी पूर्वीही केला होता. त्यानंतर अजितदादांनी पत्रक काढत भाजप नेत्यांवर टीका केली होती आणि मी आपल्या कार्यकर्त्यांसाठी सतत उपलब्ध असतो. तसेच भाजपचे नेतेदेखील मला भेटत असतात, असे प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतरही चंद्रकांतदादांनी पवार यांच्याबाबत आपला पूर्वीचाच आरोप केला. पुण्यामध्ये पाटील यांचा हस्ते ’कोविड केअर सेंटर’चे उदघाटन झाले. एसएनडीटी कॉलेजमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. 100 बेडचे हे केंद्र विलगीकरणासाठी उपयोगी ठरणार आहे. या उद्घाटनानंतर पाटील बोलत होत

अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत पाटील म्हणाले, ‘’देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणीही काहीही बोलू शकते; पण मी चॅलेंज केले होते, की अजित पवार यांना फोन लावून द्या. कारण ते गायबच होते. 24 तास ते कोणालाच उपलब्ध झाले नव्हते. त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल माझा मनात शंका नाही; पण वाढत असलेला कामाचा व्याप पाहता मला असे वाटते, की त्यांनी एकतर पुण्यातून किंवा मुंबईतून कारभार चालवावा आणि पुण्याला वेगळा पालकमंत्री द्यावा. एकूण गरज लक्षात घेता त्यांनी पुण्यातून कारभार चालवायला पाहिजे आणि पुण्यात सहज उपलब्ध व्हायला हवे. लोकांना आता दिलासा हवा आहे. रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत राजेश टोपे यांनी केलेल्या दाव्याबद्दल पाटील म्हणाले, की ग्लास अर्धा भरला आहे असाही म्हणता येते किंवा रिकामा आहे असेही म्हणता येते. महाराष्ट्र सरकारने त्यांचे अपयश लपवण्यासाठी सारखे केंद्राकडे जायचे ठरवले. नाहीतर तो चार्ट पहिला तर सगळ्यात जास्त इंजेक्शसन ही महाराष्ट्राला मिळाली आहेत. दहा दिवसांसाठी तब्बल दोन लाख 69 हजार इंजेक्शन्स दिली आहेत. ज्या गुजरातच्या नावाने आरडाओरडा होतो त्यांना एक लाख 40 हजार मिळाली आहेत.

पवार यांच्या टेबलवर एक कोटी ठेवा

रेमडेसिवीर मिळत नसल्याचा दावा करत पुणे महापालिकेच्या पदाधिकार्‍यांना आपण एक कोटी रुपये घेऊन अजित पवारांच्या टेबलवर ठेवा असे सांगितल्याचे पाटील म्हणाले. महापालिका आणि सरकारला आगाऊ पैसे देता येत नाहीत, तर जो वितरक आगाऊ पैसे मागेल त्याला भीक मागून पैसे गोळा करून मी देणार आहे. त्यांचे मिळाले की मला परत द्यायचे. मी मागितले, की भीक जास्त मिळते. शंभर कोटींचे इंजेक्शन घेऊ. संपूर्ण महाराष्ट्रात मी अ‍ॅडव्हान्स द्यायला तयार आहे.

COMMENTS