अजित दादा म्हणतात… महाविकास आघाडीकडे पूर्ण बहुमत, सरकार पडण्याचा प्रश्नच नाही…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित दादा म्हणतात… महाविकास आघाडीकडे पूर्ण बहुमत, सरकार पडण्याचा प्रश्नच नाही…

प्रतिनिधी : पुणेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या प्रमुख पदावर आहेत . त्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हे मी कस स

सेऊल दुर्घटनेचा बोध!
घरातील कपाटातून मावस बहिणीनेच लंपास केले दागिने 
राणा दाम्पत्याकडून आमच्या जीवाला धोका

प्रतिनिधी : पुणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या प्रमुख पदावर आहेत . त्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हे मी कस सांगू? असे अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री आणि माझ्यात सरकारमधील निर्णयावर चर्चा होतात. काय कसं चालवायचे , समस्यांवर तोडगा कसा काढायचा यावरही विचारविनिमय करण्यात येते . महाविकास आघाडीकडे पूणपणे बहुमत आहे . त्यामुळे सरकार पडेल हा प्रश्नच नाही .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यादरम्यान केलेल्या भाषणात भाजप -शिवसेना युतीच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. मंचावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी,

असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले .

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड मंचावर उपस्थित होते.

COMMENTS