अखेर मोदी परदेश दौऱ्यासाठी रवाना… अमेरिकेत करणार ‘ही’ कामे…

Homeताज्या बातम्यादेश

अखेर मोदी परदेश दौऱ्यासाठी रवाना… अमेरिकेत करणार ‘ही’ कामे…

प्रतिनिधी : दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दिल्लीतून अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले. हा मोदींचा पाच दिवसीय दौरा असून त्यांच्या कार्यक्र

मोदींनी भाजपची कमान हाती घेतल्यापासून पक्षाने मागे वळून पाहिले नाही… अमित शहांची स्तुतीसुमने
अग्निपथमुळे देशाचे सामर्थ्य वाढेल
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ ः पंतप्रधान मोदी

प्रतिनिधी : दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दिल्लीतून अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले. हा मोदींचा पाच दिवसीय दौरा असून त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.

अमेरिकेतील सत्ता बदलानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिली अमेरिका भेट असल्याने याला मोठे वैशिष्ट प्राप्त झाले आहे . मोदी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी PMO ने त्यांचा या दौऱ्यातील कार्यक्रमाची ‘रूपरेषा’ प्रसारित केली .

अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान क्वॉड समिट, कोविड ग्लोबल समिटमध्ये सहभागी होणार आहेत. कारण कोरोनाच्या संकटानंतर हा मोदींचा पहिला दौरा असून ते संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रालाही संबोधित करतील.

त्यानंतर नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन 24 सप्टेंबरला अमेरिकेची राजधानी वॉग्शिंटन येथे भेट घेतील

मोदी-बायडन यांच्या प्रत्यक्ष भेटीपूर्वी बायडन यांनी आयोजित केलेल्या कोरोना जागतिक परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत.

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी व्हाइट हाउसमध्ये भेट होणार आहे. यावेळी दोन्ही देशांतील संबंध कसे सुधारले जातील यासंदर्भात अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. 

या चर्चेत लोकशाही, मानवाधिकार आणि हवामान या मुद्द्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती व्हाइट हाउसमधील अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली .

मोदींची अमेरिकी कंपन्यांचे सीईओ आणि उद्योगपतींसोबत बैठक होणार आहे . २५ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७६व्या आमसभेला मोदी संबोधित करणार असल्याची माहिती आहे .

पंतप्रधान मोदींच्या नियोजित कार्यक्रम यादी थोडक्यात :

२२ सप्टेंबर : अमेरिकेसाठी रवाना होणार

२३ सप्टेंबर : अमेरिकेला दाखल होतील . नंतर ऑस्ट्रेलिया, जपानच्या पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेतील .

२४ सप्टेंबर : पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतील त्यानंतर ते क्वॉड बैठकीत सहभागी होतील .

२५ सप्टेंबर : यूएनजीएमध्ये पंतप्रधान मोदींचे संबोधन करतील .

२६ सप्टेंबर : पंतप्रधान मोदी भारतात परतणार आहेत .

COMMENTS