अखेर घ़़रोघरी जाऊन भाजी  विक्रीस मनपाची परवानगी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर घ़़रोघरी जाऊन भाजी विक्रीस मनपाची परवानगी

महापालिकेने बुधवारी रात्री आदेश जारी करून शहरातील 14 ठिकाणी रस्त्यावर होणारी भाजी विक्री बंद केली होती.

खा. प्रितम मुंडे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय उद्घाटन
तुमचे आजचे राशीचक्र गुरुवार, ०३ जून २०२१ l पहा LokNews24
राहुरीत 11 सरपंचांसाठी 88 उमेदवारांचे गुडघ्याला बाशिंग !

अहमदनगर/प्रतिनिधी- महापालिकेने बुधवारी रात्री आदेश जारी करून शहरातील 14 ठिकाणी रस्त्यावर होणारी भाजी विक्री बंद केली होती. पण यामुळे गुरुवारी नागरिकांना भाजीच मिळाली नाही. त्यामुळे काहींनी थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली. परिणामी, त्यांनी मनपाच्या अधिकार्‍यांना विचारणा केली व गुरुवारी सायंकाळी मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी सुधारित आदेश जारी करताना भाजी विक्रेत्यांना घरोघरी जाऊन भाजी विक्रीची परवानगी दिली. 

महापालिकेने नगर शहरातील भाजी मार्केट ज्या ठिकाणी सुरू आहे, ते तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिल्यानंतर त्याची दखल जिल्हाधिकारी भोसले यांनी घेऊन जनतेला भाजीपाला तात्काळ कसा उपलब्ध होईल याकरता नियोजन करा, असे आदेश त्यांनी महापालिकेचे आयुक्त गोरे यांना दिले. त्यामुळे आयुक्त गोरे यांना सायंकाळी सुधारित आदेश काढावा लागला. संचारबंदी लागू झाल्यानंतर अनेक नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने महापालिकेने नगर शहरांमधील मुख्य असे 14 भाजी बाजार ज्या ठिकाणी भरत होते, ते तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नागरिकांना कुठेही भाजीपाला उपलब्ध झाला नव्हता, त्यामुळे रस्त्यावर भाजीसाठी गर्दी झाली होती. या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी भोसले यांना विचारले असता, त्यांनी तात्काळ महापालिकेचे आयुक्त गोरे यांच्याशी संपर्क करून नगर शहरामध्ये नागरिकांना भाजी कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, हे पाहावे असे आदेश दिले. यासंदर्भात आयुक्त गोरे यांनी आम्ही भाजी विक्री करणार्‍या प्रत्येकाला त्याच्या भागामध्ये जाऊन भाजी विक्री करण्याला परवानगी देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार तसे आदेश त्यांनी सायंकाळी जारी केले.

मनपाने काढले आदेश

अहमदनगर महापालिका क्षेत्रातील भाजीपाला, फळे, दुध व इतर जीवनावश्यक विक्रेते, फेरीवाले, शेतकरी, महिला इत्यादींना कळविण्यात येते की, सध्या राज्यामध्ये, जिल्हयामध्ये व शहरामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव मोठया प्रमाणावर होत असून रुग्ण संख्या झपाटयाने वाढत आहे. या विषाणूचा फैलाव आटोक्यात आणणे आवश्यक झाले आहे. उपाययोजनेचा भाग म्हणून राज्य शासनाने राज्यामध्ये कडक निर्बंध लागु केले आहेत. त्यामुळे महापालिकेस निर्बंधाची अंमलबजावणी करणे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. सध्या शहरामध्ये संचारबंदी लागु असल्याने ज्या ठिकाणी भाजी विक्रीसाठी मोठया प्रमाणात गर्दी होते, अशा ठिकाणच्या भाजीच्या खरेदी-विक्रीस प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर किरकोळ भाजी विक्रेते यांना शहरातील व उपनगरातील चौकात किरकोळ भाजी विक्की करणे तसेच नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी भाजीपाला, फळे, दुध इत्यादी जीवनावश्यक वस्तू विक्रेते फेरीने वसाहतीमध्ये, घरोघरी जावुन संबंधितांनी कोरोना विषयक नियम व शासनाचे, जिल्हा प्रशासनाचे तसेच महापालिकेचे नियम पाळुन निर्धारित वेळेत विक्री करता येईल, असे या आदेशात स्पष्ट केले गेले आहे.

COMMENTS