सध्या अक्षय कुमार लंडनमध्ये रकुल प्रीत सिंहसोबत त्याच्या अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.अभिनेता अक्षय कुमारकडे (Akshay Kumar) सध्या
सध्या अक्षय कुमार लंडनमध्ये रकुल प्रीत सिंहसोबत त्याच्या अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.अभिनेता अक्षय कुमारकडे (Akshay Kumar) सध्या अनेक मनोरंजक प्रकल्प आहेत. ज्याची अक्षय कुमारचे चाहते वाट पाहत आहेत. तो म्हणजे राम सेतू . या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो लवकरच मायदेशी येणार आहे.
माध्यमातील माहितीनुसार राम सेतू या चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल. चित्रपटाचा काही भाग श्रीलंकेत चित्रित होणार होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे निर्मात्यांनी आता चित्रीकरणाची योजना बदलत चित्रीकरणाचे नवीन लोकेशन म्हणजे गुजरात आहे असे चित्रीकरण विभाकडून सांगण्यात आले. गुजरातमधील या नवीन लोकेशनवर चित्रपटातील चित्रीकरणात अक्षय कुमार व्यतिरिक्त स्टार अभिनेत्री नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिस सुद्धा झळकणार आहेत .
अभिषेक शर्मा ‘राम सेतु’ दिग्दर्शित करत आहेत. ‘राम सेतु’ व्यतिरिक्त, अक्षय कुमारने ‘पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ आणि ‘अतरंगी रे’साठी चित्रीकरण केले आहे. याशिवाय त्याचे ‘बच्चन पांडे’ आणि ‘सूर्यवंशी’ सारखे अनेक चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. त्याचे
COMMENTS