Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोला- फवारणीमुळे 12 जणांना विषबाधा; शेतकऱ्यांनो काळजी घेण्याचे आवाहन

अकोला : फवारणीमुळे यावर्षी 12 जणांना विषबाधा झालीय. या बारा जणांवर अकोल्यातील सरोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यापैकी आता सात जणांना डिस्चार्ज

सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्षे तरी लागणार नाही : भरत गोगावले
जागा वाटपांचे सर्वाधिकार फडणवीसांना
राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पूर्णपुणे पाठीशी : पालकमंत्री

अकोला : फवारणीमुळे यावर्षी 12 जणांना विषबाधा झालीय. या बारा जणांवर अकोल्यातील सरोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यापैकी आता सात जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. मात्र कीटकनाशकांची फवारणी करतांना गेल्या काही वर्षात अनेक शेतकऱ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला. फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यामुळे विषबाधा होऊन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. सध्या शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी देणे सुरु केले असून हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.पिकांवर फवारणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. किटकनाशक वापरण्यापुर्वी लेबल व माहिती पत्रक वाचून खबरदारीच्या सर्व सुचनांचे पालन करावे. तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करतांना संरक्षक कपडे, बुट ,हात , मोजे, नाकावरील मास्क इत्यादींचा वापर करावा. उघडया अंगाने फवारणी करणे टाळावे व नाकावर पातळ कापड झाकावा जेणेकरून श्वासाच्छावासातुन किटकनाशकाचा विपरीत परिणाम टाळता येईल याची दक्षता घ्यावी. संपूर्ण क्षेत्रावर एकाच व्यक्तीकडून फवारणी करून न घेता एका व्यक्तीकडून कमीत कमी क्षेत्रावर फवारणी करावी. एकाच व्यक्तींनी जास्त मजुरी मिळावी म्हणून जास्त क्षेत्रावर फवारणी करणे टाळावे. तसेच दररोज फवारणीचे काम करू नये. विषबाधा झाल्यास किटकनाशकाच्या माहिती पत्रकासह डॉक्टरकडे जावे. फवारणी शक्यतोर हवा कमी असताना किंवा हवेच्या दिशेने करावी. प्राधान्याने सकाळी अथवा सायंकाळी करावी. किटकनाशकांची फवारणी केल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. असे आवाहन कृषी अधिकारी मुरली इंगळे यांनी केले आहे. यावर्षी ही विषबाधेमुळे 12 शेतकरी रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनो फवारणी करताना काळजी घ्या

COMMENTS