Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विदर्भात अनुभवता येणार शून्य सावली दिवस

नागपूर/प्रतिनिधी ः शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा असून या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटासाठी सोडून जाते. राज्य

सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी | Sangali | Maharashtra News | Agriculture News (Video)
घोडच्या आवर्तनासाठी ग्रामस्थ व पाणी वापर संस्थेचा प्राणांतिक उपोषणाचा इशारा
शेतकर्‍याने बैलाच्या मृत्यूनंतर बांधली समाधी

नागपूर/प्रतिनिधी ः शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा असून या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटासाठी सोडून जाते. राज्यात 3 मे पासून प्रारंभ झाला असून 31 मे पर्यंत शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे, दरम्यान विदर्भात 17 मे पासून 28 मे पर्यंत शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50ओ दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणार्‍या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शुन्य सावली दिवस येतात.

COMMENTS