Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झेंडीगेट दक्षिणमुखी हनुमान मंदिरात 56 भोग अन्नकोट उत्साहात संपन्न

रात्री 8 वा. सुरु झालेला हा उत्सव दोन-अडीच तास सुरु होता

अहमदनगर प्रतिनिधी - झेंडीगेट येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सालाबाद प्रमाणे यंदाही 56 भोग अन्नकोट उत्सव उत्साहात संपन्न झाला. मंदिरातील म

नगर तालुक्यात विद्यार्थ्यांची लसीकरणासाठी हेडसाळ मंत्र्यांचे दुर्लक्ष !
वसंत रांधवण राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानीत
अत्याचार बाधितांच्या आठ वारसांना शासकीय नोकरी

अहमदनगर प्रतिनिधी – झेंडीगेट येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सालाबाद प्रमाणे यंदाही 56 भोग अन्नकोट उत्सव उत्साहात संपन्न झाला. मंदिरातील मुख्य गाभार्यात हनुमान देवते शेजारी श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली होती. त्यासमोर 56 प्रकारचे अन्नपदार्थ नैवेद्य म्हणून देऊन सभा मंडपात भजन, हनुमान चालिसा पठण निर्विघ्न पार पडले. मंदिराचा गाभारा सुंदर तर दिसे, त्याबरोबरच मंदिरात मंद सुगंध दरवळत होता. मंदिरात रंगीबेरंगी दिवे प्रकाशित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पुजा, आरती, भक्तीभावाने संपन्न झाली. हनुमान देवतेचा श्रद्धेने जय..जयकार करीत भाविकांनी आनंद व्यक्त केला.

     गावरान तूपातील चविष्ट पक्कान्न होते. केशर, बेदाणा, बदाम आणि उच्च प्रतिचे धान्य, तांदूळाचे पदार्थही होते. शेंगदाणे घालून बनविलेला मसाले भात, पुरी-भाजी असे विविध अन्नपदार्थ मुक्त हस्ते भक्तांच्या थाळीत वाढले जात होते. गोड, आंबट, तूरट, कडू, तिखट, खारट असे चवीचे अनेक पदार्थ येथे होते मंदिराच्या सभामंडपात महिलांच्या पंगती होत्या, तर मंदिराच्या आवारात पुरुषांच्या पंगती होत्या. रात्री 8 वा. सुरु झालेला हा उत्सव दोन-अडीच तास सुरु होता. गत दोन वर्षात कोविडच्या प्रादुर्भावामुळे मंदिरात 56 भोग अन्नकोट उत्सव साध्या पद्धतीने संपन्न झाला होता. पण, यंदाचा उत्सव हा आनंदोत्सव होता. राहुल कावट व आशिष  कावट यांनी विधीवत पूजा, आरती करुन प्रसादाचे वाटप केले. त्यानंतर महाप्रसादाचा स्वाद भाविकांनी घेतला. सामन्य, असामान्य, प्रतिष्ठीत अशा सर्वांची ती अंगत-पंगत होती. देवस्थान प्रमुख रामदास कावट यांनी भक्तांचे स्वागत केले.शेवटी साईनाथ कावट यांनी आभार मानले. त्यानंतर उत्सवाची सांगता झाली.

COMMENTS