Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक अध्यक्ष पदावरून हकालपट्टी

मुंबई ः महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला सध्या धक्के बसत आहेत. मुंबई काँग्रेसमधील मोठे नाव आणि वांद्रे पूर्वचे माजी आमदार बाबा सिद्धीकी यांनीही काँग

solapur : काँग्रेस पक्षाच्यावतीने मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयासमोर आंदोलन (Video)
शंकर भालेकर यांचे निधन
यशवंत घोडे फोफसंडीकर यांना कविरत्न पुरस्काराने सन्मानित

मुंबई ः महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला सध्या धक्के बसत आहेत. मुंबई काँग्रेसमधील मोठे नाव आणि वांद्रे पूर्वचे माजी आमदार बाबा सिद्धीकी यांनीही काँग्रेसची साथ सोडली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले. एकापोठापाठ एक बसलेल्या या धक्क्यांमधून काँग्रेस सावरत आहे. आता काँग्रेसने बाबा सिद्धीकी यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर कारवाई केली आहे. झिशान यांची मुंबई युवक अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. आता मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अखिलेश यादव यांना देण्यात आली आहे.

COMMENTS