Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झिशान आणि सलमानला जीवे मारण्याची धमकी

मुंबई :माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेला अवघे काही दिवस होत नाही तोच त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी आणि अभिनेता

महिला सरपंचानी नियमांची माहिती व अभ्यासतून गावांचा सर्वागींण विकास करावा – पालकमंत्री सुभाष देसाई
नोरा फतेहीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक | LokNews24
देवळाली प्रवरा गावात चोरट्यांनी फोडली आठ घरे

मुंबई :माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेला अवघे काही दिवस होत नाही तोच त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी आणि अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सिद्धिकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात फोन करत झिशान सिद्धिकी आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली आहे. सलमान खान सध्या बिश्‍नोई गँगच्या रडारवर आहे. सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सलमान खानशिवाय राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यालाही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच मुंबई पोलिसांनी धमकीचा फोन करणार्‍याला नोएडा येथून अटक केली. केवळ टाइमपास म्हणून फोन केल्याचे आरोपीने तपासात सांगितले आहे.

COMMENTS