Z.P निवडणुकांची तारीख झालीय जाहीर,  मात्र  लक्ष लागलंय सरकार आणि विरोधी पक्षाकडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Z.P निवडणुकांची तारीख झालीय जाहीर, मात्र लक्ष लागलंय सरकार आणि विरोधी पक्षाकडे

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं ही घोषणा केलीय. 5 ऑक्टो

तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं : अण्णा हजारेंचा इशारा
कृषी, वने व ग्रामविकासाच्या योजनांची सांगड घालून साधा गावाचा सर्वांगिण विकास : पोपटराव पवार
नगर शहराच्या आमदारांचं नीच राजकारण…. फलक लावत निषेध

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं ही घोषणा केलीय. 5 ऑक्टोबरला मतदान तर 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यात कुठल्याही निवडणुका नको अशी भूमिका विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह सत्ताधारी महाविकास आघाडीने घेतली आहे. मात्र, आता निवडणुका घोषित झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तारीख जाही
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर अर्ज दाखल करता येणार
21 सप्टेंबर अर्जाची छाननी होणार
29 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार
5 ऑक्टोबरला मतदान
6 ऑक्टोबरला निकाल

किती जागांसाठी निवडणूक
जिल्हा परिषदेच्या 85 जागा
पचंयात समितीच्या 144 जगा

COMMENTS