देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी फॅक्टरी येथुन सायंकाळी रस्त्याने जात असलेल्या बसला थांबवून मी इथला भाई आहे. असे म्ह
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी फॅक्टरी येथुन सायंकाळी रस्त्याने जात असलेल्या बसला थांबवून मी इथला भाई आहे. असे म्हणून एका तरूणाने बसवर दगडफेक केली. या घटनेत बसचे नूकसान झाले असून एक प्रवाशी महिला जखमी झाली. राहुरी फँक्टरी येथिल सागर उल्हारे तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबात संदीप नारायण मोरे, (वय 34 वर्षे), हे दौंड आगारात एसटी बस चालक आहेत. ते दिनांक 8 मे रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान बस क्रमांक एम एच 14 बीटी 1228 ही बारामती ते शिर्डी बस घेऊन निघाले होते. दरम्यान राहुरी फँक्टरी येथील ताहराबाद चौकात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास प्रवासी गाडीतुन खाली उतरत असतांना एक इसम मोटरसायकलवर आला व मला म्हणाला की, मी येथील भाई आहे. असे म्हणुन त्याने बस चालकाला शिवीगाळ करुन एस. टी. बस वर दगडफेक केली. तेव्हा चालक त्याला म्हणाला की, आम्ही काय केले विनाकारण तु आम्हाला कशाला काय म्हणतो, तेव्हा तो म्हणाला की, मी येथील भाई असुन या चौकात मी ज्याला थांब म्हणतो, ते सर्व थांबतात. असे म्हणुन पुन्हा शिवीगाळ करुन येथुन पुढे तुम्ही एस. टी. नेलीतर तुमचा बेतच पाहतो अशी धमकी दिली. सदर इसमाने एस. टी. बसवर दगडफेक केली. त्यामुळे एस. टी मधील असलेली महीला प्रवाशी शारदा श्रीकांत नाचनेकर, (वय 50 वर्षे, रा. शांताक्रूझ, मुंबई). यांना किरकोळ दुखापत झाली असुन एस. टी. बसचे नुकसान झाले. एस.टी. बस मध्ये एकुण 50 ते 55 प्रवासी होते. त्यानंतर चालकाने तेथील लोकांना सदर इसमाचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव व गाव सागर उल्हारे रा. राहुरी फक्टरी ता. राहुरी असे सांगितले. हा तरुण मोटारसायकल क्र. एम एच 17 सी 7713 अला होता. त्यानंतर चालक एस. टी. बस घेउन राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यसाठी आले. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर उल्हारे, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी. याचे विरुद्ध गुन्हा रजि. नं. 480/2023 भादंवि कलम 337, 427, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस करीत आहे.
COMMENTS