Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणांनी संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ः निवृत्ती महाराज देशमुख

कोपरगाव - आजच्या तरुण पिढीने पाश्‍चात्य संस्कृती स्वीकारताना भारतीय संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे, भारतीय संस्कृती, परंपरा महान असून संत ज्ञानेश

भंगार चोरून नेणारे पाच आरोपी जेरबंद
नगरच्या नयना खेडकर हिने चीनमध्ये कुंग फू खेळात पटकाविले रौप्य पदक
LokNews24 l बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यांवर धाड

कोपरगाव – आजच्या तरुण पिढीने पाश्‍चात्य संस्कृती स्वीकारताना भारतीय संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे, भारतीय संस्कृती, परंपरा महान असून संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी सातशे वर्षांपूर्वीच आजच्या शोधाबददल भाकीत केले होते, चित्रपट शंभर वर्षांपूर्वी तयार झाला परंतु ज्ञानेश्‍वर महाराजांनी सातशे वर्षांपूर्वीच वर्णन केले आहे. अशी ज्ञानेश्‍वरी प्रत्येकाने अभ्यासली पाहिजे. ज्ञानेश्‍वरी व तुकाराम गाथा माणसाच्या जीवनाचा प्रेरणादायी आहे, ज्ञानेश्‍वरीची एक तरी ओवी अभ्यासुन चिंतन केले तर आयुष्य सुखी समाधानी होते असे विचार समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले.
कै.ह.भ.प महादु देवराम पाटील भवर (माऊली) यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. आण्णासाहेब महादु भवर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. साहित्यिक छायाचित्रकार हेमचंद्र भवर, सुदर्शन वृत्तवाहिनीचे राजेंद्र भवर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. किर्तन सेवेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ह भ प इंदोरीकर महाराज म्हणाले की, ’ आज समाजात विकार आजार वाढत आहेत, माणूस मानसिक ताण तणावाच्या ओझ्याने दबला आहे, आजचा माणूस हसणं विसरून गेला आहे त्यामुळे आजारपण वाढले आहेत.’ पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या समारंभास पंचक्रोशीतील मान्यवर, संस्थांचे पदाधिकारी, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजू (राधाकिसन) सुखदेव भवर यांनी आभार मानले.

COMMENTS